हातावरील मेहंदीचा रंग गडद होण्यासाठी करा हे '5' घरगुती उपाय
ही कल्पना जरी हास्यास्पद वाटत असली तरी अनेकदा मेहंदी रंगत नाही म्हणून अनेक मुलींचा हिरमोड होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी करता येतील असे 5 सोपे उपाय सांगणार आहोत, ज्याने तुमच्या मेहंदीचा रंग गडद होईल.
लग्नसराईचा काळ सुरु झाला असून बाजारपेठेतही याची लगबग पाहायला मिळत आहे. मग लग्नातील कपडे खरेदी पासून फोटोग्राफर, मेकअप आर्टिस्ट, मेहंदी आर्टिस्ट शोधण्याची तयारी दिसून येईल. यात नवरीचा मेकअप, तिची मेहंदी कशी असावी हा मोठा प्रश्न पडलेला असतो. सध्या अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या मेहंदीची थीम आल्यामुळे वधूची मेहंदी जितकी चांगली काढता येईल तितकी ती सुंदर बनविण्याचा प्रयत्न मेहंदी आर्टिस्ट करतात. ब-याचदा मेहंदी चांगली काढलीही जाते मात्र त्याचा रंग किती गडद होतो याकडे सर्वांचे लक्ष असते.
असं म्हणतात, जितका मेहंदीचा रंग गडद असेल तितकं नव-याचं प्रेम जास्त असतं. ही कल्पना जरी हास्यास्पद वाटत असली तरी अनेकदा मेहंदी रंगत नाही म्हणून अनेक मुलींचा हिरमोड होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी करता येतील असे 5 सोपे उपाय सांगणार आहोत, ज्याने तुमच्या मेहंदीचा रंग गडद होईल.
पाहा 5 घरगुती उपाय:
1. हातावर मेहंदी काढल्यानंतर त्याला पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच मेहंदीवर साखरेचे पाणी न लावता केवळ लिंबूचा रस आणि त्यात साखर मिसळून तो रस मेहंदीवर लावावा.
हेदेखील वाचा- थंडीत कशा पद्धतीचा मेकअप कराल; मेकअप आर्टिस्ट विनायक वरदे यांच्याकडून माहित करून घ्या काही खास टिप्स
2. मेहंदी काढताना ती कधीही पाण्याने धुवू नये. त्या जागी मेहंदी काढण्याच्या 4-5 तास आधी तेल लावावे. त्यानंतर ती खरडून काढावी.
3. तुम्ही जास्त वेळ हाताला मेहंदी लावून ठेवू शकत नसल्यास मेहंदी काढल्यानंतर ती साधारण 3-4 तास ठेवावी त्यात 3-4 वेळा त्यावर लिंबू-रस आणि साखर यांचे मिश्रण लावावे. त्यानंतर ती हाताने खरडून त्यावर विक्स किंवा आयोडेक्स किंवा मोहरीचे तेल लावावे आणि 6-7 तास ठेवावे.
4. मेहंजी हाताने काढल्यानंतर तुम्ही त्यावर नीलगिरीचे तेल लावू शकतो. निलगिरीचे तेल हे उष्ण असल्याने मेहंदीचा रंग गडद होतो.
5. मेहंदी काढलेल्या हातावर तुम्ही लवंगाचा धूर ही घेऊ शकता. तसेच लोणच्याचे तेलही लावू शकता.
सर्वात महत्वाचे कोणत्याही कार्यक्रमासाठी मेंदी लावायची असेल तर नियत तिथीच्या एक किंवा दोन दिवस आधी मेंदी लावायला हवी. ज्यानेकरून मेहंदीला गडद रंग चढतो.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)