'India Weekend' in New York: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरद्वारे न्यू यॉर्कमध्ये 3 दिवसांच्या 'इंडिया वीकेंड' कार्यक्रमाचे आयोजन; जागतिक व्यासपीठावर सादर होणार भारतीय कला, संगीत, नृत्य, फॅशन आणि खाद्यसंस्कृती

‘इंडिया वीकेंड’ची सुरुवात 12 सप्टेंबर रोजी लिंकन सेंटरमधील डेव्हिड एच. कोच थिएटर येथे एका खास ‘ग्रँड वेलकम’ या समारंभाने होईल. हा समारंभ केवळ आमंत्रितांसाठी असेल, ज्यामध्ये प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी क्युरेट केलेला ‘स्वदेश फॅशन शो’ सादर होईल.

NMACC

मुंबईतील (Mumbai) नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र () 12 ते 14 सप्टेंबर 2025 या कालावधीत न्यूयॉर्क शहरात (New York City) पहिल्यांदाच ‘इंडिया वीकेंड’ (India weekend) हा सांस्कृतिक उत्सव साजरा करणार आहे. हा तीन दिवसीय उत्सव लिंकन सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे आयोजित होणार असून, भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला जागतिक व्यासपीठावर सादर करण्याचा हा एक ऐतिहासिक प्रयत्न आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि एनएमएसीसीच्या संस्थापक नीता अंबानी (Nita Ambani) यांनी हा उपक्रम जाहीर केला आहे, ज्यामुळे भारतीय कला, संगीत, नृत्य, फॅशन आणि खाद्यसंस्कृती जगासमोर येणार आहे.

‘इंडिया वीकेंड’ची सुरुवात 12 सप्टेंबर रोजी लिंकन सेंटरमधील डेव्हिड एच. कोच थिएटर येथे एका खास ‘ग्रँड वेलकम’ या समारंभाने होईल. हा समारंभ केवळ आमंत्रितांसाठी असेल, ज्यामध्ये प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी क्युरेट केलेला ‘स्वदेश फॅशन शो’ सादर होईल. हा फॅशन शो भारताच्या पारंपरिक हातमाग आणि हस्तकला यांचे वैभव दाखवेल. यासोबतच, मिशेलिन-स्टार शेफ विकास खन्ना यांनी तयार केलेला प्राचीन ते आधुनिक भारतीय खाद्यपदार्थांचा विशेष अनुभव सादर होईल.

या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे ‘द ग्रेट इंडियन म्युझिकल: सिव्हिलायझेशन टू नेशन’ हे एनएमएसीसीचे भव्य नाट्यप्रदर्शन. दिग्दर्शक फेरोज अब्बास खान यांचा हा शो भारताच्या 5000 ईसापूर्व ते 1947 मधील स्वातंत्र्यापर्यंतच्या प्रवास नृत्य, संगीत, कला आणि नाट्य यांच्या माध्यमातून सादर केला जाईल. यासह या कार्यक्रमात ‘ग्रेट इंडियन बाजार’ हा कार्यक्रमही असेल. या बाजारात भारतीय फॅशन आणि हस्तकला, स्वादिष्ट खाद्यपदार्थ, तसेच नृत्य, योग आणि संगीत अशा अनेक बाबी अनुभवायला मिळतील. दररोज सकाळी भजन, मंत्रोच्चार आणि गीता वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल.

प्रसिद्ध योग तज्ज्ञ एडी स्टर्न यांच्या मार्गदर्शनाखाली योग कार्यशाळा आयोजित होतील, तर शामक दावर आणि त्यांच्या टीमद्वारे बॉलीवूड नृत्य कार्यशाळा घेतल्या जातील. शंकर महादेवन, श्रेया घोषाल यांसारखे नामांकित गायक 12 आणि 13 सप्टेंबर रोजी आपली कला सादर करतील, तर पार्थिव गोहिल यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक गरबा आणि दांडिया रासही सादर केले जाईल. 14 सप्टेंबर रोजी सतारवादक रिशब शर्मा शास्त्रीय आणि समकालीन संगीताचा संगम सादर करतील, आणि उत्सवाची सांगता ‘फूलों की होली’ आणि रेट्रो नाइट्स थीम असलेल्या डीजे सेटने होईल. (हेही वाचा: मॅरियट इंटरनॅशनलकडून नवीन प्रादेशिक कलेक्‍शन ब्रँड 'सिरीज बाय मॅरियट™'च्‍या जागतिक लाँचची घोषणा)

नीता अंबानी यांनी हार्वर्ड इंडिया कॉन्फरन्स 2025 मध्ये या उपक्रमाची घोषणा केली, जिथे त्यांनी भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर नेण्याची आपली दृष्टी व्यक्त केली. मुंबईच्या बांद्रा कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये असलेले एनएमएसीसी हे भारतातील पहिले बहु-विषय सांस्कृतिक केंद्र आहे. यात 2,000 आसनांचा ग्रँड थिएटर, 250 आसनांचा स्टुडिओ थिएटर आणि 125 आसनांचा क्यूब यांचा समावेश आहे. 'इंडिया वीकेंड' साठी तिकिट बुकिंग लवकरच सुरू होईल, आणि याबाबत अधिक माहिती एनएमएसीसीच्या अधिकृत वेबसाइट www.nmacc.com आणि लिंकन सेंटरच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल. तिकिटे ऑनलाइन बुकमायशो किंवा एनएमएसीसीच्या पोर्टलवर उपलब्ध होतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement