Fabindia कडून दिवाळीनिमित्त सुरु केलेल्या 'जश्न- ए-रिवाज' कॅम्पेनवरुन वाद
क्लॉथिंग, होम डेकोर आणि लाइफस्टाइल प्रोडक्ट्स संबंधित कंपनी फॅब इंडियाच्या (Fabinida) फेस्टिव्ह सीजन कॅम्पेनवरुन वाद निर्माण झाला आहे.
क्लॉथिंग, होम डेकोर आणि लाइफस्टाइल प्रोडक्ट्स संबंधित कंपनी फॅब इंडियाच्या (Fabinida) फेस्टिव्ह सीजन कॅम्पेनवरुन वाद निर्माण झाला आहे. खरंतर फॅब इंडियाकडून सणासुदीच्या निमित्ताने जश्न-ए-रिवाज कॅम्पेनची सुरुवात करण्यात आली आहे. यावरुन आता भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्य यांनी टीका केली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट ही केले आहे.
फॅबइंडियाने एक ट्विट करत असे म्हटले, जसे की आम्ही प्रेम आणि प्रकाशाचा सणाचे स्वागत करतो, फॅबइंडिया द्वारे जश्न-ए-रिवाज ही अशी एक संकल्पना आहे जी भारतीय संस्कृतिला समर्पित करते. खरंतर फॅब इंडियाने याबद्दल लॉन्चिंग करताना Vougue यांच्या एका रिपोर्ट्समध्ये म्हटले होते. त्याचसोबत देशातील रंग, परिस्थिती आणि व्यक्तित्वाला जवळ घेण्यासारखे हे असल्याचे ही म्हटले होते.(Beauty Tips: मास्क घातल्यानंतर तुमची Lipstick बिघडते का? मग 'या' खास पद्धती नक्की वापरुन पहा)
Tweet:
फॅबइंडियाच्या या कॅम्पेनवरुन प्रथम पद्मश्री आणि मणिपाल ग्लोबस एज्युकेशनचे चेअरमन मोहनदास पाई यांनी टीका केली. त्यांनी असे म्हटले की, दिवाळीच्या निमित्त फॅब इंडियाचे हे अत्यंत लज्जास्पद विधान. हा एक हिंदू धार्मिक सण असून जसे क्रिसमस आणि ईद हे दुसऱ्यांचे सण आहे. अशा पद्धतीचे विधान एका धार्मिक सणाला संपुष्टात आणण्याचा विचार करुन केलेला प्रयत्न दाखवून देतो.
एका युजरने जेव्हा जश्न ए रिवाज कॅम्पेनला योग्य ठरवले तेव्हा मोहनदास पाई यांनी त्यांच्या ट्विट मध्ये असे म्हटले की, तुम्हाला कळले नाही. एका हिंदू सणासाठी विदेशी शब्दांचा प्रयोग हा आपली परंपरा हिरावून घेण्यासह नष्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. दिवाळीनंतर तुम्ही कोणत्याही ब्रँन्डच्या नावाचा वापर करु शकता. मात्र या वेळी दिवाळीशी त्याचा संबंध जोडणे हे विकृत मानसिकता दाखवते.
त्यानंतर फॅब इंडियावर टीका केली जाऊ लागली. बीजेवायएमचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांनी म्हटले की, दीपावली जश्न ए रिवाज नाही आहे.
Tweet:
फॅब इंडियाच्या या दिवाळीच्या कॅम्पेवरुन खुप जणांनी टीका करण्यास सुरुवात केली. तर एका युजरने प्रश्न विचारत असे म्हटले की, करवाचौथ, दीपावली, भाऊबीज हे मुस्लिम सण आहेत का? जे तुम्ही जश्न ए रिवाज नाव लिहित आहात.