Study Tips For Students: मुलांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी करा 'हे' उपाय

आता शाळेत परिक्षांची तयारी सुरु झालीच असावी. मुलांच्या परिक्षा म्हणजे पालकांसाठी आव्हानात्मत काम बनले आहे

study Tips For students

Study Tips For Students: मुलांच्या शाळा सुरु होवून महिना झाला आहे. आता शाळेत परिक्षांची तयारी सुरु झालीच असावी. मुलांच्या परिक्षा म्हणजे पालकांसाठी आव्हानात्मत काम बनले आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना अभ्यासाठी गोडी लावले किंवा मुलांमध्ये अभ्यासाची सवय लागणे कठीण झाले आहे. तरीही मुलांमध्ये योग्य पध्दतीने अभ्यासाची आवड निर्माण करता येते. यासाठी पालकांनी खाली दिलेल्या  उपायाचा वापर करावा. जेणे करून मुले अभ्यास करतील. (हेही वाचा- मुलांना डिजिटल गॅजेट्सच्या व्यसनापासून दूर कसे ठेवायचे? घ्या जाणून)

1. अभ्यासाचे वातावरण 

घरात मुलांच्या अभ्यासाठी एक शांत आणि सुव्यवस्थित जागा निवडा. या जागेत कोणतीही अनावश्यक वस्तू नसाव्यात. मुलांचे लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्या. नियमितपणे वेळेवर अभ्यास करण्याची सवय लावा.

2. अभ्यासाचे उद्दिष्ट निश्चित करा

सर्वप्रथम मुलांना अभ्यासाचे महत्त्व समजवा. दिवसाचे, आठवड्याचे आणि महिन्याचे उद्दिष्ट निश्चित करून द्या. त्यानंतर टार्गेट पूर्ण करण्यास सांगावे. दिवसांचे टार्गेट पूर्ण झाल्यानंतर मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना शाबासकी द्यावी.

3. अभ्यासात रुची वाढवा

पालांनो, मुलांमधील आवडत्या विषयांची माहिती गोळा करा. दररोज अभ्यासाची सुरवात आवड्या विषयांपासून सुरु करा. त्याच्या शैली जाणून घ्या आणि त्यांचे नियोजन करून द्या. धडा किंवा कविता शिकताना खेळ किंवा मनोंरजनाच्या माध्यमातून शिकवा.

4. मुलांच्या प्रगतीचे निरीक्षण करा आणि प्रोत्साहन द्या 

शाळेत चाललेल्या गोष्टींकडे लक्ष द्या. त्याच सोबत दररोज मुलांमध्ये होणाऱ्या प्रगतीचे निरिक्षण करा. त्यांनी मिळवलेल्या गुणांकडे लक्ष द्या. त्याबद्दल त्यांचे प्रशंसा करा. मुलांमध्ये नेहमीच छोट छोट्या गोष्टी घडत असतात. त्याबद्दल प्रोत्साहन करा आणि योग्य मार्गदर्शन करा.

5. नकारात्मक गोष्टी दूर करा.

अभ्यासकरण्यापूर्वी मुलांना फ्रेश करा. त्यांचा आत्मविश्वास वाढेल अश्या गोष्टींचा विचार त्यांच्या समोर करा. मुख्यता, अभ्यासासंदर्भात मुलांसमोर नकारात्मक गोष्टींचा विचार करू नका आणि बोलू नका.

6.  चांगली संगत

मुलांच्या मित्र मैत्रीणींवर लक्ष द्या. मुलांची चांगली संगत असणे अभ्यासावर परिणामकारक ठरू शकते. अभ्यासापासून ते खाऊ पर्यंत शेअर करता आले पाहिजे. योग्य संगत मुलांना नेहमी उत्सुक ठेवते.

7. शिक्षणात विविधता 

केवळ पुस्तके वाचण्यापेक्षा व्हिडिओ, चार्टस आणि इतर शैक्षणिक वस्तूचा वापर करून अभ्यासाची गोडी निर्माण करा. प्रायोगिक शिक्षणावर भर द्या आणि मुलांची कल्पकता वाढवण्यासाठी प्रयत्न करा.

8. योग्य आहार आणि विश्रांती

मुलांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी त्यांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्याची काळजी घ्या. योग्य आहार आणि विश्रांती द्या. नियमित व्यायामाने त्यांच्या एकाग्रता सुधारते.

मुलांना चांगली सवय लागण्यासाठी पालकांची महत्त्वाची भुमिका असते. त्यामुळे पालकांनी अभ्यासासंदर्भात नकारात्मक भुमिका घेऊ नका याचा परिणाम मुलांवर होऊ शकतो. मुलांवर सतत ओरडणे आणि मारणे सोडून द्या. योग्य मार्गदर्शन आणि समजवून सांगणे मुलांवर परिणामकारक ठरू शकते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif