Diwali Safety Tips: अस्थमा, हृदय विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी दिवाळीत अशी स्वत:ची काळजी
घरातील लहान मुलांच्या आनंदात सहभागी होऊन थोर मोठे त्यांच्या शरिराकडे दुर्लक्ष करताना आढळते. सध्या अस्थमा (Asthma) आणि हृदय विकाराच्या (Heart Disorders) समस्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दिवाळीत फटक्यामुळे होणाऱ्या धुराचा अनेकांना त्रास होतो, यात जर कोणाला अस्थमा किंवा हृदय विकाराचा त्रास असेल तर, अशा व्यक्तींचे घराबाहेर पडणे कठीण होते.
दिवाळी (Diwali 2019) हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. घरातील लहान मुलांच्या आनंदात सहभागी होऊन थोर मोठे त्यांच्या शरिराकडे दुर्लक्ष करताना आढळते. सध्या अस्थमा (Asthma) आणि हृदय विकाराच्या (Heart Disorders) समस्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दिवाळीत फटक्यामुळे होणाऱ्या धुराचा अनेकांना त्रास होतो, यात जर कोणाला अस्थमा किंवा हृदय विकाराचा त्रास असेल तर, अशा व्यक्तींचे घराबाहेर पडणे कठीण होते. दिवाळीच्या आनंदात कोणत्याही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पुढील माहिती अनेकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
अस्थमा रुग्णांसाठी आवश्यक माहिती-
1) या दिवसात पोल्युशन मास्कचा वापर करा.
2) इन्हेलर, नेबुलाइजर यांसारखी औषध स्वताजवळ ठेवा.
3) घराचे दरवाजे आणि खिडक्या व्यवस्थित बंद करा. अन्यथा धुर घरात शिरल्याने श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
4) अस्थमाचा झटका आल्यानंतर किंवा वरील कोणत्याही समस्या निर्माण झाल्यानंतर उशीर न करता जवळील रुग्णालयाला भेट द्या.
5) महत्वाचे म्हणजे, कोणताही उपाय करण्या अगोदर डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे
हृदय विकाराच्या रुग्णांसाठी आवश्यक माहिती-
1) नियमित औषध घ्या.
2) अधिक मिठ आणि गोड पदार्थांचा सेवन करणे टाळा.
3) वेळेवर झोपा आणि आपले शरिर निरोगी आणि तंदरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करा.
4) फटाक्यांमुळे हवेत निर्माण होणाऱ्या धुरांपासून दूर राहणे आवश्यक आहे. कारण यामुळे स्ट्रेस, भिती वाटणे अस्वस्था, हार्टचा अॅटक सारखी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.
दिवाळीच्या दिवशी घराबाहेर शक्य असल्यास घराबाहेर पडणे टाळा. कारण दिवाळीत फटाक्यामुळे वातावरण प्रदुषित होते. एवढेच नव्हेतर, त्यावेळी धुरामध्ये कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, सल्फर हे हवेमध्ये मिसळून जातात. यामुळे अस्थमाच्या रुग्णांना अधिक त्रास होण्याची शक्यता निर्माण होते. महत्वाचे म्हणजे, अशावेळी श्वास घेण्यास त्रास होतो, अस्वस्थ वाटू लागते आणि सर्वात धक्कादायक म्हणजे अस्थमाचा अटॅकही येऊ शकतो.