Monkeypox Virus | (Photo Credits: Wikimedia Commons)

WHO Report on Monkeypox: मंकीपॉक्स विषाणू (Monkeypox Virus) चा संसर्ग जगभरात वेगाने पसरत आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक ताजा आकडा सादर केला आहे, जो भयावह आहे. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, गेल्या 20 दिवसांत मंकीपॉक्सचा संसर्ग 27 देशांमध्ये पसरला आहे. तसेच आतापर्यंत 780 लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला. सर्वात चिंतेची बाब म्हणजे या विषाणूने आता लोकांचा जीव घेण्यास सुरुवात केली आहे. कांगोमध्ये या वर्षी मंकीपॉक्समुळे नऊ जणांचा मृत्यू झाला, तर नायजेरियामध्ये पहिला मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

या धोकादायक विषाणूच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 31 मे रोजी एक मार्गदर्शक सूचनाही जारी केली. भारतात आतापर्यंत या आजाराचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. तरीही भारत सरकार खबरदारी घेत आहे. मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे की, मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीवर 21 दिवस नजर ठेवली जाईल. (हेही वाचा - Norovirus in Kerala: केरळमध्ये नोरोव्हायरसच्या 2 रुग्णांची नोंद; नोरोव्हायरस म्हणजे काय? कारणे, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या)

मार्गदर्शक तत्त्वात असेही म्हटले आहे की, संसर्गाच्या काळात रुग्ण किंवा त्यांच्या दूषित सामग्रीशी शेवटचा संपर्क झाल्यानंतर 21 दिवसांच्या कालावधीसाठी दररोज निरीक्षण केले पाहिजे. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर एखाद्याला मंकीपॉक्सची लक्षणे दिसली, तर लॅबमध्ये चाचणी केल्यानंतरच मांकीपॉक्सची पुष्टी केली जाईल. मांकीपॉक्ससाठी केवळ पीसीआर किंवा डीएनए चाचणी वैध असेल, असेही मार्गदर्शक तत्त्वात स्पष्ट करण्यात आलं आहे. (हेही वाचा -

मंकीपॉक्स संसर्गाची कारणे काय आहेत?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते हा संसर्ग मंकीपॉक्स नावाच्या विषाणूमुळे होतो. हा विषाणू ऑर्थोपॉक्स विषाणू गटाशी संबंधित आहे. या गटातील इतर सदस्यांमुळे मानवांमध्ये चेचक आणि काउपॉक्स सारखे संक्रमण होतात. डब्ल्यूएचओच्या मते, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला मंकीपॉक्सचा संसर्ग होण्याची फारच कमी प्रकरणे आहेत. बाधित व्यक्तीच्या शिंकणे, खोकल्यामुळे, संक्रमित व्यक्तीच्या त्वचेवरील जखम किंवा संक्रमित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कामुळे इतर लोकांना संसर्ग होण्याची शक्यता असते.

मंकीपॉक्सवरील उपचार -

चेचक निर्मूलन कार्यक्रमादरम्यान वापरल्या जाणार्‍या लसींनी देखील मंकीपॉक्सपासून संरक्षण प्रदान केले जाते. या आजारावर नवीन लसी विकसित करण्यात आल्या आहेत. ज्यापैकी एक रोग प्रतिबंधासाठी मंजूर करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या म्हणण्यानुसार, चेचकांवर उपचार करण्यासाठी विकसित केलेल्या अँटीव्हायरल एजंटला मंकीपॉक्सवर उपचार करण्यासाठी परवानाही देण्यात आला आहे.