COVID19: एकच मास्क 5 पेक्षा अधिक वेळ वापरणे टाळा, तज्ञांनी पुर्नवापराबद्दल दिला 'हा' सल्ला
यामुळे तज्ञांकडून N95 मास्क घालण्याचा सल्ला नागरिकांना दिला जातो. तर तुम्हाला माहिती आहे का? एकच मास्क किती वेळा वापरला पाहिजे अथवा नाही?
COVID19: कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मास्क घालणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे तज्ञांकडून N95 मास्क घालण्याचा सल्ला नागरिकांना दिला जातो. तर तुम्हाला माहिती आहे का? एकच मास्क किती वेळा वापरला पाहिजे अथवा नाही? तर CDC यांनी लोकांना असा सल्ला दिला आहे की, चेहऱ्यावर योग्य पद्धतीने फिट होणारा मास्क नेहमी वापरावा.(Corona कायम राहणार, Delta आणि Omicron सोबत आपल्याला आयुष्य जगावे लागणार असल्याचा विशेषतज्ञांचा दावा)
काही वेळ लोक एकच मास्क काही दिवस वापरतात. तर काहीजण सैल किंवा व्यवस्थित न बसणारा मास्क ही वापरतात. अशा प्रकारचे मास्क कोरोनाचे संक्रमण होण्यापासून बचाव करु शकत नाही. त्यामुळे तज्ञांनी मास्क किती दिवस आणि कसा वापरायचा याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे मेडिसिनचे असिस्टंट प्रोफेसर माइकल जी नाइट यांनी The Washington Post यांना असे सांगितले की, जर तुम्ही 45 मिनिटांसाठी एखाद्या कामासाठी घराबाहेर जात असल्यास मास्क घाला आणि नंतर काढा. असा मास्कचा पुन्हा वापर करण्यास काहीच हरकत नाही. परंतु तुम्ही पूर्ण दिवस मास्क घालत असाल तोच पुन्हा वापरत असाल तर त्यामुळे नुकसान होऊ शकते.
स्वत:कडे जादा मास्क ठेवत जा. जेणेकरुन ते वेळेनुसार बदलता येईल. दीर्घकाळ एकच मास्क वापरु नका. काही तासांसाठी जरी तुम्ही एकच मास्क वापरत असाल तर तो 4-5 दिवसांनी खराब होते. सीडीसीनुसार, N95 रेस्पिरेटर मास्कचा उपयोग 5 पेक्षा अधिक वेळा करु नये.(Omicron: लहान मुलांना ओमिक्रॉनचा संसर्ग का होतोय? तज्ञांनी सांगितले कारण)
मास्कचा वापर केल्यानंतर आपले हात जरुर धुवा. ईयरलूप्स किंवा इलास्टिक बँन्डचा वापर करुन मास्क काढा. मास्कच्या बाहेरच्या बाजूला अधिकाधिक स्पर्श करणे टाळा. माइकल जी नाइट यांच्यानुसार, मास्कची स्थिती आणि त्याचे फिटिंग यावरुन तो तपासून पाहता येईल की तो घालण्यायोग्य आहे की नाही. मास्क घातल्यानंतर शिंका आल्यानंतर तो पुन्हा वापरणे टाळा.मास्क हा एका पेपर बॅगमध्ये ठेवण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. मास्क स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याचा हा उत्तम पर्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.