अबब! Condom झाले TV पेक्षा महाग, एका पॅकेटची किंमत तब्बल 60,000 रुपये, जाणून घ्या कुठे
तो कोणता देश आहे हे जाणून घ्या
लोकसंख्येच्या वाढीला आळा घालण्यासाठी आणि लैंगिक संक्रमित रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, अनेक देशात कंडोम विनामूल्य किंवा अतिशय स्वस्त दरात वितरित केले जातात. पण जगातील सर्वच देशांमध्ये असे होत नाही. काहीजण या जीवनावश्यक वस्तूसाठी अवाजवी शुल्क आकारतात. एका देशात कंडोमच्या एका पॅकेटची किंमत सुमारे 60,000 रुपये इतकी आहे. ही किंमत नियमित वापरल्या जाणाऱ्या कंडोमची आहे. तो कोणता देश आहे आणि या देशात कंडोमची किंमत इतकी का बर आहे हे जाणून घ्यायचे आहे का ? [हे देखील वाचा:- Cervical Cancer Vaccine : कर्करोग विरोधी लस HPV भारतात बनवली जाणार, DGCA कडून लस उत्पादनास मान्यता]
संपूर्ण बातमी वाचा:-
तर उत्तर व्हेनेझुएला आहे.व्हेनेझुएला शहरात कंडोमच्या एका पॅकेटची किंमत ही टेलिव्हिजन सेटच्या किमतीपेक्षाही जास्त आहे. त्या शहरात ही किंमत नियमित वापरल्या जाणाऱ्या कंडोमची आहे. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जगात अनेक नामांकित आणि महाग कंडोम ब्रँड्स असले तरी, एवढ्या महागड्या कंडोमबद्दल तुम्ही कधीच ऐकले नसेल. कंडोमच्या या भरमसाठ किंमतीमुळे देशात खळबळ उडाली आहे.
का मिळतात कंडोम 60 हजारला, जाणून घ्या कारण
दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशात कोणत्याही परिस्थितीत गर्भपात हा कायदेशीर गुन्हा आहे. गर्भपाताची परिस्थिती टाळण्यासाठी, लोक आधीच सावध राहून काळजीपूर्वक संबंध ठेवतात. या कारणामुळे येथे गर्भनिरोधकाशी संबंधित वस्तू महाग होत आहेत. रिपोर्ट्सनुसार, इतर गर्भनिरोधक उत्पादनांच्या तुलनेत येथे गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी अधिक आहे. व्हेनेझुएला येथे कंडोम इतका महाग आहे तरी सुद्धा लोक हौसेने खरेदी करतात आणि गर्भनिरोधक गोळ्यांची किंमतही जवळपास 5-7 हजार रुपये इतकी आहे. इतकंच नाही तर व्हेनेझुएलामध्ये गर्भपातालाही बंदी आहे. ते बेकायदेशीरपणे करून घेण्यासाठी कठोर शिक्षा देखील आहे. UN च्या स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2015 नुसार, व्हेनेझुएलामध्ये किशोरवयीन गर्भधारणेची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसते.