Chandra Grahan 2019 : नववर्षातलं आज पहिलं खग्रास चंद्रग्रहण! भारतामध्ये 'इथे' पहायला मिळणार आजचं चंद्रग्रहण LIVE

आज सकाळी भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे सकाळी ९ वाजून ४ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून २१ मिनिटांपर्यंत खग्रास चंद्रग्रहण आहे.

Chandra Grahan 2019 | Representational Image (Photo credits: Twitter/ChrisPage90)

Lunar Eclipse 2019: नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात आज वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण (Lunar Eclipse) आहे. आज सकाळी भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे सकाळी 9 वाजून 4 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 21  मिनिटांपर्यंत खग्रास चंद्रग्रहण आहे. खगोलीय या घटनेबाबत अने कांच्या मनात उत्सुकता असते मात्र आजचं चंद्रग्रहण भारतीयांना पाहता येणार नसले तरीही संध्याकाळी सुपरमून आणि ब्लडमूनचं मात्र दर्शन होणार आहे. त्यामुळे आज त्यासाठी सज्ज रहा. Chandra Grahan 2019: 21 जानेवारीला वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण, जाणून घ्या वेळ आणि खास गोष्टी

चंद्रग्रहण कुठे पहाल?

चंद्रग्रहण मिडल ईस्ट, आफ्रिका, यूरोप, अमेरिका, ओसेनिआ आणि रशियाचा पूर्वभाग येथून दिसणार आहे. आज भारतीयांना टीव्ही, युट्युबवरच चंद्रग्रहण पहाण्याची संधी मिळणार आहे. ग्रहणाच्या बाबतीत आपल्या समाजात अनेक समज गैरसमज आहेत. मात्र खगोलप्रेमींसाठी अशी पर्वणी क्वचितच पहायला मिळते.