Ashadhi Ekadashi 2022 Messages: आषाढी एकादशीनिमित्त खास Greetings, Wishes, Images पाठवून द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा

असे मानले जाते की, या काळात असुर प्रबळ होतात आणि त्यांच्या शक्‍तींपासून सुरक्षित राहण्यासाठी आषाढी एकादशीचे व्रत करणे आवश्यक आहे, कारण एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते.

Ashadhi Ekadashi 2022 Messages (File Image)

मराठी वर्षातील आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणार एकादशीला ‘आषाढी एकादशी’ किंवा ‘देवशयनी एकादशी’ (Ashadhi Ekadashi 2022) असे म्हणतात. हा दिवस संपूर्ण वारकरी मंडळींसाठी फार मोठा दिवस आहे, कारण या दिवशी पंढरपुरात राज्यातील सर्व दिंड्या पोहोचतात व विठ्ठल-रखुमाईच्या पायी नतमस्तक होऊन मोठ्या उत्साहाने हा एकादशीचा उत्सव साजरा होतो. यावर्षी रविवार 10 जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी 2022 आहे. विठ्ठल रुक्माई हे महाराष्ट्राचे दैवत. आषाढी एकादशीच्या दिवशी गेल्या आठशे वर्षांपासून वारकरी संप्रदाय आपल्या दिंड्या, वारी घेऊन विठुरायाच्या भेटीसाठी येत आहेत.

आषाढी एकादशीला धार्मिक व अध्यात्मिक महत्व आहे. असे मानले जाते की, या काळात असुर प्रबळ होतात आणि त्यांच्या शक्‍तींपासून सुरक्षित राहण्यासाठी आषाढी एकादशीचे व्रत करणे आवश्यक आहे, कारण एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरु होतो. त्या दिवशी देव झोपतात म्हणून या एकादशीला 'देवशयनी एकादशी' असे म्हणतात. आषाढी एकादशीला भगवान विष्णूची आराधना आणि उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.

तर अशा या मंगल दिनी आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना खास मराठी Facebook Greetings, WhatsApp Stickers, Wallpapers, Wishes, Images पाठवून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा: आषाढी एकादशीला JIO TV App देणार विठ्ठल रूक्मिणीचं 24 तास लाईव्ह दर्शन)

Ashadhi Ekadashi 2022 Messages
Ashadhi Ekadashi 2022 Messages
Ashadhi Ekadashi 2022 Messages
Ashadhi Ekadashi 2022 Messages
Ashadhi Ekadashi 2022 Messages

दरम्यान, आषाढी एकादशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, एदलाबाद येथून मुक्ताबाई यांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. यासोबत लाखो वारकरी देखील पंढरपुरात दाखल होतात, जे चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात.