Isha Anand Wedding: ईशा-आनंदच्या विवाहसोहळ्यासाठी अमेरिकन सिंगर Beyonce भारतात दाखल
ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या विवाहसोहळ्यात दाखल होण्यासाठी आता अमेरिकन सिंगर बियॉन्से देखील भारतात पोहचली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन आणि भारतातील सर्वात श्रीमंत, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) हिचा विवाह उद्योगपती आनंद पिरामलसह (Anand Piramal) 12 डिसेंबरला मुंबईत होणार आहे. या शाही लग्नसोहळ्याचे प्री वेडिंग सेलिब्रेशन उदयपूरमध्ये सुरु झाले आहे. या विवाहसोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक दिग्गज भारताबाहेरुनही येथे दाखल झाले आहेत. आता अमेरिकन सिंगर बियॉन्से (American Singer Beyonce) देखील भारतात पोहचली आहे. ईशा अंबानीच्या विवाहसोहळ्यात देसी गर्ल प्रियंका चोप्रा लावणार ठुमके !
8 डिसेंबरला सलमान खान (Salman Khan), ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan), कतरिना कैफ (Katrina Kaif) यांसारखे अनेक बॉलिवूड स्टार्स प्री वेडींग सेलिब्रेशनसाठी उदयपूरला रवाना झाले. ईशा अंबानीच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी हिलेरी क्लिंटन (Hillary Clinton) उदयपूरमध्ये दाखल झाल्या. Isha Ambani-Anand Piramal प्री वेडिंग सेलिब्रेशनमध्ये नीता अंबानींचा बहारदार डान्स
आनंद पिरामल, ईशा अंबानी आणि बियॉन्से (Photo Credits: Yogen Shah)
या प्री वेडिंग सेलिब्रेशनमध्ये फक्त धमाल, मज्जा मस्ती, डान्स इतकंच नसून अंबानींकडून अन्नसेवाही केली जात आहे. Isha Ambani-Anand Piramal यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात; अंबानींकडून 5100 लोकांसाठी अन्नसेवा
अमेरीकन सिंगर बियॉन्से (Photo Credits: Yogen Shah)
12 डिसेंबरला ईशा आणि आनंद हिंदू परंपरेनुसार मुंबईतील अंबानी हाऊसमध्ये विवाहबद्ध होतील.
(The above story first appeared on LatestLY on Dec 09, 2018 04:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

