Akash Ambani-Shloka Mehta Wedding: आकाश अंबानी-श्लोका मेहता यांच्या शाही लग्नपत्रिकेचा थाट सोशल मीडियावर व्हायरल (Video)

रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी लवकरच मैत्रिण श्लोका मेहता हीच्या सोबत विवाहबद्ध होणार आहे.

Akash Ambani-Shloka Mehta Wedding Card (Photo Credits: Instagram)

अंबानी कुटुंबात पुन्हा एकदा लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी Nita Ambani) यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) लवकरच मैत्रिण श्लोका मेहता (Shloka Mehta) हीच्या सोबत विवाहबद्ध होणार आहे. 9 मार्चला हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता अंबानी यांच्यासमवेत मुंबईतील सिद्धिविनायक चरणी आकाश-श्लोकाची लग्नपत्रिका अर्पण केली. या शाही लग्नपत्रिकेचा थाट सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. 23-25 फेब्रुवारीला Switzerland मध्ये आकाश-श्लोकाच्या प्री वेडींग सेलिब्रेशनची धूम

लग्नपत्रिकेवर राधा-कृष्णाचा फोटो आहे. कार्ड ओपन करताच लाईट लागते आणि कृष्णाचे गाणे वाजू लागते.

तुम्हीही पाहा लग्नपत्रिकाचा खास व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

First Look of @ambani_akash and @shlokakhialaniofficial Wedding Invite @shloka_mehta_official and @akash ambani @shloka_akash_ambani @shlokamehta_ #akashloka #akashambani #shlokamehta #wedding #weddingcard

A post shared by Latestly (@latestly) on

 

View this post on Instagram

 

The celebrations have begun. Congratulations Shloka and Akash #Shloka #Akashambani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

9 मार्चला आकाश-श्लोका विवाहबद्ध होणार असून 11 मार्चला दोघांचे ग्रँड रिसेप्शन असेल. गेल्या वर्षीच 12 डिसेंबरला अंबानींची मुलगी ईशाचा आनंद पीरामलसोबत विवाह झाला. या विवाहसोहळ्याला अनेक दिग्गजांसह बॉलिवूड सेलिब्रेटी उपस्थित होते.