Zomato आणि Swiggy वर जेवण मागवणं झालं महाग; डिलीव्हरी चार्जेस वाढवल्याने ऑनलाईन ऑर्डरचा टक्का घसरला

मात्र, ग्राहकांना आता ऑनलाइन जेवण मागवणं महाग पडणार आहे. तुम्हीही स्विगी आणि झोमॅटोवरून ऑनलाईन पद्धतीने (Online Food Order) जेवण मागवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून स्विगी तसेच झोमॅटोने तुमच्याकडून डिलीव्हरी चार्जेसच्या (Food Delivery Charges) नावाखाली जास्त पैसे वसूल करत आहे.

Zomato, Swiggy Delivery Charges (Photo Credits: Twitter)

स्विगी (Zomato) आणि झोमॅटोसारख्या (Swiggy) ऑनलाइन कंपन्या ग्राहकांना जेवण, खाद्यपदार्थ पुरवतात. मात्र, ग्राहकांना आता ऑनलाइन जेवण मागवणं महाग पडणार आहे. तुम्हीही स्विगी आणि झोमॅटोवरून ऑनलाईन पद्धतीने (Online Food Order) जेवण मागवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून स्विगी तसेच झोमॅटोने तुमच्याकडून डिलीव्हरी चार्जेसच्या (Food Delivery Charges) नावाखाली जास्त पैसे वसूल करत आहे.

'द इकोनॉमिक टाइम्स' (The Economic Times) च्या एका रिपोर्टनुसार, झोमॅटो आणि स्विगीसारख्या डिलीव्हरी अॅप (Food Delivery App) काही महिन्यांपासून ग्राहकांकडून जास्त डिलीव्हरी चार्जेस वसूल करत आहे. परंतु, आता झोमॅटो आणि स्विगीने वाढवलेल्या डिलीव्हरी चार्जेसचा फटका या कंपन्यांच्या ऑनलाईन ऑर्डरला बसला आहे. तसेच प्रत्येक महिन्याला येणाऱ्या ऑर्डर्समध्ये 5 ते 6 टक्क्यांची घट झाली आहे. (हेही वाचा - भंडारा: वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणाने घेतले मेल्याचे सोंग; पहा व्हायरल व्हिडिओ)

मागच्या आठवड्यामध्ये झोमॅटोने उबेर इट्सबरोबर करार केला. त्यामुळे या करारानुसार, उबेर इट्सला झोमॅटोमध्ये 10 टक्के हिस्सा मिळणार आहे. या करारानंतर ग्राहकांना सेवा देण्यास उशीर झाला तर त्या ग्राहकाला फ्री डिलीव्हरी सेवा देण्याचा निर्णय झोमॅटोने घेतला आहे. झोमॅटोने डिलीव्हरी चार्चेससह गोल्ड मेंबरशिपचे दरही वाढवले आहेत. ज्या ऑर्डर्ससाठी झोमॅटो 999 रुपये आकारत होता. त्यात आता 80 टक्क्यांची वाढ झाली आहे.