Zomato कडून Uber Eats ची खरेदी; तब्बल 2485 कोटी रुपयांमध्ये पार पडला व्यवहार

झोमॅटोने उबेर ईट्सचा भारतीय व्यवसाय सुमारे $35 दशलक्ष म्हणजेच 2485 कोटी रुपयात खरेदी केला आहे

Zomato Uber acquisition funny memes (Photo Credits: Twitter)

झोमॅटो (Zomato) या ऑनलाइन फूड डिलिव्हरी (Online Food Delivery) अ‍ॅपने, उबर ईट्स इंडिया (Uber Eats) कंपनी विकत घेतली आहे. झोमॅटोने उबेर ईट्सचा भारतीय व्यवसाय सुमारे $35 दशलक्ष म्हणजेच 2485 कोटी रुपयात खरेदी केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीमध्ये उबरचे आता फक्त 9.9 टक्के शेअर्स असतील.

कॅब सेवेमार्फत फूड डिलिव्हर करणारी कंपनीची ही योजना भारतात आपली कमाल दाखवू शकली नाही. अशा परिस्थितीत, कंपनीने आपले जवळजवळ सर्व शेअर्स झोमॅटोला विकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रात्री 3 वाजता हा करार झाला असून, उबर ईट्सचे ग्राहक मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून झोमॅटो अ‍ॅपवर शिफ्ट झाले आहेत.

उबर इट्सच्या खरेदीमुळे झोमॅटोचा बाजारातील वाटा 50% पेक्षा जास्त वाढेल. सध्या स्विगी 48% वाटासह प्रथम क्रमांकावर आहे. झोमॅटो आणि स्विगी यांच्या स्पर्धेमुळे उबर ईट्सचा नुकसान होत होते. गेल्या 5 महिन्यांत कंपनीला 2,197 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. उबरने 2017 मध्ये भारतात फूड डिलिव्हरी व्यवसाय सुरू केला. कंपनीकडे 41 शहरांमधील 26,000 रेस्टॉरंट्सची यादी आहे. दुसरीकडे, 24 देशांमधील 1.5 दशलक्ष रेस्टॉरंट्स माहिती झोमॅटोच्या रेस्टॉरंट डिस्कवरी आणि फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. कंपनी दरमहा सुमारे 70 दशलक्ष वापरकर्त्यांना सेवा करते. (हेही वाचा: Zomato च्या डिलिव्हरी बॉयला लग्नानंतर 7 वर्षात 11 मुले, ग्राहकाने टिप मध्ये दिले कंडोम)

झोमॅटोने काही दिवसांपूर्वी आपले गुंतवणूकदार अँट फायनान्शियलकडून 15 दशलक्ष डॉलर्स (1065 कोटी रुपये)ची नवीन गुंतवणूक घेतली होती. झोमॅटोचे 300 दशलक्ष डॉलर्स (21,300 कोटी रुपये)चे मूल्यांकन गृहित धरून अँट फायनान्शलने ही गुंतवणूक केली आहे. त्याद्वारे उबर ईट्सची खरेदी झाली. झोमॅटो उबर ईट्सच्या कर्मचार्‍यांना घेणार नाही. त्यामुळे उबर ईट्सच्या सुमारे 100 कर्मचाऱ्यांना दुसऱ्या व्यवसायात गुंतवेल अथवा त्यांना काढून टाकण्यात येईल.