Zirakpur: एक लाख द्या, नाहीतर तुमची पत्नी आणि मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करतो; जीरकपूर येथील एका व्यावसायिकाला धमकी

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

तुमची पत्नी आणि मुलीचा अश्लील व्हिडिओ (Videos) माझ्याकडे आहे. 1 लाख रुपये द्या, नाहीतर यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करेल. जीरकपूरच्या (Zirakpur) व्ही. आय. पी रो (VIP Road) परिसरातील एका व्यवसायिकाला अशा धमकीचा (Extortion) फोन आला आहे. या प्रकरणी व्यावसायिकाने या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली आहे. ज्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. हिंदुस्थान टाईम्सने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने फिर्यादी व्यक्तीला फोन केला. तसेच तुमच्या पत्नी आणि मुलीचा अश्लील व्हिडिओ, फोटो त्याच्याजवळ असल्याचे त्याने सांगितले. एक लाख रुपये नाही दिले तर, त्याच्याजवळ असलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकीही त्याने फिर्यादीला दिली. यानंतर संबंधित व्यक्तीने त्याच्यासोबत घडलेला सर्व प्रकार जीरकपूर पोलिसांना सांगितला. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे देखील वाचा- Pune Police Stations: पुणे जिल्ह्यात नव्या 9 पोलीस ठाण्यांना मंजूरी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत निर्णय

याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे. आरोपीने कोणत्या ठिकाणावरून फोन केला आहे? याचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांना फसवणुकीचे फोन आले आहेत. यामुळे संबंधित व्यक्तिला आलेला फोन हा एक फसवणुकीचाच प्रकार आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement