Ghaziabad Shocker: गाझियाबादमधील कौशांबी मेट्रो स्टेशनच्या फलाटावरून उडी मारल्याने तरुणाचा मृत्यू; पत्नीची हत्या करून झाला होता फरार

इंदिरापुरमचे सहाय्यक पोलिस आयुक्त स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले की, स्टेशनवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून इतर माहिती संकलित करण्यात येत आहे.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Ghaziabad Shocker: सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कौशांबी पोलिस स्टेशन (Kaushambi Police Station) हद्दीतील कौशांबी मेट्रो स्टेशन (Kaushambi Metro Station) च्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून एका तरुणाने उडी मारली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत गौरव हा आग्रा येथील रहिवासी होता.

इंदिरापुरमचे सहाय्यक पोलिस आयुक्त स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले की, स्टेशनवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून इतर माहिती संकलित करण्यात येत आहे. (हेही वाचा -Agra Shocker: सहा वर्षाच्या मुलीची बलात्कारानंतर निर्घृण हत्या, आरोपीला अटक, आग्रा येथील धक्कादायक घटना)

प्राप्त माहितीनुसार, गौरवने काल रात्री अकराच्या सुमारास पत्नी लक्ष्मी हिचा गळा चिरून खून केला होता. घटनेनंतर गौरव घरातून निघून गेला होता. दोघांना दीड वर्षाचा मुलगाही आहे. कौशांबी पोलिसांनी गुडगावच्या फेज 3 पोलिस ठाण्याशी संपर्क साधला आहे. (हेही वाचा - Uttar Pradesh: क्रिकेट खेळल्यानंतर पाणी प्यायल्याने 17 वर्षीय मुलाचा मृत्यू, हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय)

तथापी, घटनेची माहिती मिळाल्यानंतर गौरवच्या कुटुंबियांनी आणि इतर नातेवाईकांनी कौशांबी पोलीस ठाणे गाठले. गौरवच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी शोक व्यक्त केला आहे. पोलिस या संपूर्ण घटनेची चौकशी करत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif