IPL Auction 2025 Live

Madhya Pradesh Crime: गर्लफ्रेंडची इच्छा पूर्ण करण्यासाठी तरुणाने विकल्या चोरीच्या बाईक, 'असं फुटलं बिंग'

मध्य प्रदेशातील इंदौर येखील भंवरकुआन परिसरात बीबीएच्या विद्यार्थ्यासह दोन जणांना चोरीच्या १० दुचाकींसह अटक करण्यात आली आहे.

Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

Madhya Pradesh Crime:  मध्य प्रदेशातील इंदौर येखील भंवरकुआन परिसरात बीबीएच्या विद्यार्थ्यासह दोन जणांना चोरीच्या 10 दुचाकींसह अटक करण्यात आली आहे. बीबीएच्या विद्यार्थ्याने आपल्या गर्लफ्रेंडच्या इच्छा आणि गरजा पुर्ण करण्यासाठी बाईक चोरल्या आणि या महागड्या बाईक स्वस्त दरात विकायचा. परिसरातून महागड्या बाईक चोरील्या गेल्याच्या घटना समोर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.  (हेही वाचा- कोल्हापुरात 50 हजारांच्या टोमॅटोची चोरी)

मिळालेल्या माहिती नुसार, प्रभू सिंग भाटी असं आरोपीचे नाव आहे, तो राजस्थानचा रहिवासी आहे. चोरी गेलेल्या बाईकचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक पथक नेमलं. पोलिसांनी परिसरातून एका नोंदणी क्रमांक नसलेल्या दुचाकीवरून आलेल्या एकाला अडविले आणि त्याच्याकडून कागदपत्रे मागितले. परंतु त्याच्याकडून काहीच कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी त्याला अटक केले. सदर बाईक १४ फेब्रुवारीला चोरी झाल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी आणखी दोन चोरट्यांचा शोध सुरु ठेवला.

अटक करण्यात आलेल्या प्रभूने दुचाकी चोरल्याचे कबुली दिली. देवास जिल्ह्यातील कपिल सोनी यांना चोरीच्या बाईक दिल्याचे सांगितले. कपिल बीबीएचा विद्यार्थी आहे. तो चोरीच्या बाईक विकत घ्यायचा आणि ऑनलाईन पैसे द्यायचा. आरोपींकडून आता पर्यंत शहरातील इतर भागातून चोरलेल्या १० दुचाकी जप्त केल्या आहे. या घटनेतील आणखी एक आरोपी फरार आहे, पोलिस त्याच्या शोधात आहे. पवन असं तिसऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याकडे आणखी दोन बाईक असल्याचे कबुल केले आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली,