Hyderabad Video: कार्यालयासमोर नवीन बॅनर लावताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू, हैद्राबाद येथील घटना
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Hyderabad Video: हैद्राबादच्या (Hydrabad) एलबी नगरमध्ये एका महिलेचा कार्यालयासमोर नवीन बॅनर लावताना विजेचा धक्का (Electric Shock) लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. महिलेला विजेचा धक्का बसला आणि ती तिथेच जमिनीवर कोसळली. (हेही वाचा-विजेचा धक्का लागल्याने दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू, तीन शेतकरी जखमी)
मिळालेल्या माहितीनुसार, चिलुमुला अरुणा (25) असं विजेचा धक्का लागून मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती खासगी सल्लागार म्हणून काम करायची. हैद्राबाद येथील जगत्याला जिल्ह्यातील कोरूतला येथील रहिवासी आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती दिली की, महिला कार्यालयासमोर नवीन बॅनर लावत होती. तेवढ्यात तिला विजेचा धक्का लागला. विजेचा धक्का लागताच ती जमीनीवर कोसळली.
या घटनेनंतर काही मिनिटांनंतर महिलेच्या सहकाऱ्याने तातडीने रुग्णालयात दाखल केल. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही घटना समोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी केली आहे. महिलेला विजेचा धक्का कसा लागला या बाबत पोलिसांचा शोध सुरु आहे.