Hardik Patel च्या 'चिंतन'मुळे वाढणार काँग्रेसचा ताण! म्हणाले, 'राहुल गांधींना भेटल्यानंतरचं अंतिम निर्णय घेणार'
त्यात हार्दिक पटेलच्या नावाचाही समावेश होता. मात्र, हार्दिक पटेल चिंतन शिबिरात पोहोचले नाहीत.
निवडणुकीतील एकापाठोपाठ एक पराभवामुळे कमी होत चाललेल्या काँग्रेस पक्षाचे राजस्थानमध्ये तीन दिवसीय चिंतन शिबिर सुरू आहे. या चिंतन शिबिरात सोनिया गांधी, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह काँग्रेसचे जवळपास सर्वच मोठे नेते सहभागी होणार आहेत. तीन दिवसीय चिंतन शिबिराच्या माध्यमातून सर्व मतभेद मिटवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू असतानाच, काही नेते मात्र पक्षावर नाराज आहेत. निमंत्रण असूनही गुजरात युवक काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) चिंतन शिबिरात पोहोचले नाहीत. त्यांच्याशिवाय जी-23 मध्ये असलेले कपिल सिब्बल हेही चिंतनशिबिरात आले नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने 430 प्रतिनिधींना चिंतन शिबिरात येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यात हार्दिक पटेलच्या नावाचाही समावेश होता. मात्र, हार्दिक पटेल चिंतन शिबिरात पोहोचले नाहीत. मात्र, पक्षात दीर्घकाळ उपेक्षित राहिलेले जनार्दन द्विवेदी पक्षाच्या हाकेवर चिंतन शिबिरात आले. (हेही वाचा - Hanuman Chalisa Row: नवनीत राणा आणि तिचा पती रवी उद्या दिल्लीच्या कॅनॉट प्लेसवर हनुमान चालिसाचे करणार पठण)
मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवस चालणाऱ्या चिंतन शिबिरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाबाबत कोणतीही चर्चा होणार नसून चर्चेचा मुद्दा केवळ भाजपला रोखणे आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित असणार आहे.
यापूर्वी हार्दिक पटेलने गुजरात दौऱ्यात राहुल गांधी यांची भेट न घेतल्याने राहुल यांना पाच तासांत अनेक नेत्यांना भेटावे लागल्याचे म्हटले होते. 15 दिवसांपूर्वी राहुल गांधींनी वेळ मिळताच त्यांच्याशी बोलू, असा संदेश त्यांना पाठवला होता. चिंतन शिबिरात सहभागी न झाल्याने हार्दिक पटेल भाजपमध्ये दाखल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गुजरात सरकारने नुकताच हार्दिक पटेलवरील खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.