PM Modi Cabinet 3.0: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कोण किती शिकलेलं? काही मंत्री 12वी पास तर काहींनीचं पूर्ण केली आहे पदव्युत्तर पदवी, वाचा सविस्तर

त्यापैकी 10 मंत्री पदव्युत्तर आहेत. सहा वकील असून तीन मंत्री एमबीए पदवीधर आहेत.

PM Modi Cabinet 3.0 प्रतिकात्मक प्रतिमा (PC - @patel_natu)

PM Modi Cabinet 3.0: नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या भव्य समारंभात पंतप्रधान मोदींसह 72 खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधानांव्यतिरिक्त, 30 कॅबिनेट मंत्री, पाच राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 36 राज्यमंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आज शपथ घेऊन पंतप्रधान मोदींनी सलग तीन वेळा देशाचे पंतप्रधान राहिलेले देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची बरोबरी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील सहभागी झाले होते. याशिलाय पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभाला भारताच्या शेजारी देशांचे नेतेही उपस्थित होते. या सोहळ्यात मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील नेत्यांनी कितीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे? मोदींच्या नव्या सरकारमध्ये किती सुशिक्षित मंत्री आहेत? ते जाणून घेऊयात. (हेही वाचा - PM Kisan Nidhi Funds: तिसऱ्या टर्ममधील पंतप्रधानांचा पहिला आदेश; पीएम किसान निधीच्या आदेशावर केली स्वाक्षरी)

10 पदव्युत्तर, 6 वकील -

पंतप्रधान मोदींच्या 72 सदस्यीय मंत्रिमंडळात एकूण 30 कॅबिनेट मंत्री आहेत. त्यापैकी 10 मंत्री पदव्युत्तर आहेत. सहा वकील असून तीन मंत्री एमबीए पदवीधर आहेत.  (हेही वाचा -Narendra Modi Takes Oath as PM For Third Term: देश-विदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ (Video))

मोदींच्या मंत्र्यांमध्ये नितीन गडकरी, जेपी नड्डा, पीयूष गोयल, सर्बानंद सोनोवाल, भूपेंद्र यादव आणि किरेन रिजिजू यांच्याकडे कायद्याची पदवी आहे. तर राजनाथ सिंह, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारामन, एस. जयशंकर, धर्मेंद्र प्रधान, डॉ. वीरेंद्र कुमार, मनसुख मांडविया, हरदीप सिंग पुरी, अन्नपूर्णा देवी आणि गजेंद्र सिंह शेखावत हे पदव्युत्तर पदवीधर आहेत. तसेच मनोहर लाल खट्टर, एचडी कुमारस्वामी, जीतन राम मांझी, राजीव रंजन उर्फ ​​लालन सिंह, प्रल्हाद जोशी आणि गिरीराज सिंह हे पदवीधर आहेत.

कॅबिनेट मंत्री आणि त्यांची पात्रता - 

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

मोदी सरकार 3.0 च्या शपथविधी सोहळ्यात भाजप नेते संजय सेठ, सतीश चंद्र दुबे, भगीरथ चौधरी, डॉ. पेम्मासानी चंद्रशेखर, भाजप नेते कमलेश पासवान, अजय टमटा, डॉ. एल. मुरुगन, व्ही सोमन्ना, निखिल खडसे, दुर्गा दास उईके, नित्यानंद राय, राजभूषण चौधरी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif