PM Modi Visits: पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत कोणत्या देशांना भेट दिली? यावर किती खर्च झाला? हा खर्च कोण करतं? जाणून घ्या

यामध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, ब्राझील, इंडोनेशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, मलेशिया, मालदीव, म्यानमार, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड आणि थायलंड यांचा समावेश आहे.

PM Narendra Modi (PC - ANI)

PM Modi Visits: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सहा दिवसांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. सर्वप्रथम 19 मे रोजी पंतप्रधान जपान (Japan) ला पोहोचले. येथे त्यांनी G-7 शिखर परिषदेला हजेरी लावली. यानंतर पंतप्रधान पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले. आता पंतप्रधान ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. पीएम मोदींच्या या भेटीची चांगलीच चर्चा आहे. 2014 पासून आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 68 परदेश दौऱ्यांद्वारे 64 देशांचा दौरा केला आहे. असे काही देश आहेत जिथे पंतप्रधानांनी एकापेक्षा जास्त वेळा भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत कोणत्या देशांना भेट दिली आहे? या भेटीवर किती खर्च झाला? हा खर्च कोणते मंत्रालय करते? हे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात...

पंतप्रधान मोदी सध्या कोणत्या देशांच्या दौऱ्यावर आहेत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी पहिल्यांदा जपानमधील G-7 शिखर परिषदेला हजेरी लावली. यावेळी पंतप्रधान मोदींनी शांतता, स्थिरता आणि समृद्धी, अन्न, खत आणि ऊर्जा सुरक्षा, आरोग्य, लैंगिक समानता, हवामान बदल यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. याशिवाय पंतप्रधान मोदींनी येथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचीही भेट घेतली. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर दोन्ही देशांच्या अध्यक्षांमधील ही पहिलीच भेट होती. (हेही वाचा - PM Modi Gets Warm Welcome In Sydney: सिडनीत पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत, Watch Video)

यानंतर पंतप्रधान मोदी पापुआ न्यू गिनीला पोहोचले. पापुआ न्यू गिनीला भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट होती. येथे त्यांना पापुआ न्यू गिनी आणि फिजीच्या पंतप्रधानांनी जागतिक नेतृत्वासाठी त्यांच्या देशाचा सर्वोच्च सन्मान 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी' प्रदान केला. जगात फक्त काही गैर-फिजीयनांना हा सन्मान मिळाला आहे. आता पीएम मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत.

पंतप्रधान मोदींनी यापूर्वी दिली या देशांना भेट -

जगात असे 36 देश आहेत जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा भेट दिली आहे. यात अर्जेंटिना, बहारीन, बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फिजी, इराण, आयर्लंड, इस्रायल, इटली, जॉर्डन, केनिया, लाओस, मॉरिशस, मेक्सिको, मंगोलिया, मोझांबिक. , नेदरलँड, ओमान, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी, पॅलेस्टाईन, फिलीपिन्स, पोर्तुगाल, कतार, रवांडा, सेशेल्स, स्पेन, स्वीडन, ताजिकिस्तान, टांझानिया, तुर्की, तुर्कमेनिस्तान, युगांडा, व्हॅटिकन सिटी, व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदींनी दोन वेळा भेट दिलेले देश -

पंतप्रधानांनी जगातील 16 देशांना दोनदा भेट दिली आहे. यामध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, ब्राझील, इंडोनेशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, मलेशिया, मालदीव, म्यानमार, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड आणि थायलंड यांचा समावेश आहे. दरम्यान, पीएम मोदींनी श्रीलंका, ब्रिटन आणि उझबेकिस्तानला प्रत्येकी तीन वेळा भेट दिली आहे. सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये पंतप्रधान मोदी चार वेळा गेले आहेत. पंतप्रधान मोदींनी प्रत्येकी पाच वेळा चीन, नेपाळ आणि रशियाला भेट दिली आहे. तसेच त्यांनी फ्रान्स आणि जर्मनीला सहा वेळा भेट दिली आहे. याशिवाय मोदींचे आतापर्यंत अमेरिका आणि जपानमध्ये सात दौरे झाले आहेत.

PM मोदींच्या परदेश दौऱ्याचा खर्च किती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचा खर्च केंद्रीय गृह मंत्रालय उचलते. पंतप्रधान कार्यालयाने 2014 ते नोव्हेंबर 2022 पर्यंतची आकडेवारी सार्वजनिक केली आहे. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा भूतानला भेट दिली. या प्रवासासाठी चार्टर्ड विमानाचा एकूण खर्च 2 कोटी 45 ​​लाख 27 हजार 465 रुपये होता. यानंतर ब्राझीलच्या दौऱ्यावर चार्टर्ड विमानाचा एकूण खर्च 20 कोटी 35 लाख 48 हजार रुपये झाला. पंतप्रधान मोदींच्या प्रत्येक परदेश दौऱ्यावर चार्टर्ड विमानांवर जवळपास तेवढीच रक्कम खर्च केली जाते. पंतप्रधान मोदी अमेरिकेला गेले तेव्हा 21 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2019 दरम्यान चार्टर्ड विमानावर सर्वाधिक खर्च करण्यात आला. या दौऱ्यावर चार्टर्ड विमानाची किंमत 23 कोटी 27 लाख नऊ हजार रुपये असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. पीएम मोदींनी हवाई दलाच्या बोईंग बिझनेस जेट म्हणजेच बीबीजे जेटनेही अनेक परदेश दौरे केले आहेत. यावरील खर्चाचा तपशील अद्याप अद्ययावत झालेला नाही.