Weather Forecast Tomorrow: कसे असेल देशातील उद्याचे हवामान, जाणून घ्या, 13 ऑगस्ट रोजीचा अंदाज

उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभाग (IMD) ने उद्याचा म्हणजेच 13 ऑगस्टचा अंदाज जाहीर केला आहे. IMD नुसार, पुढील 7 दिवसांत राजस्थान, उत्तर प्रदेश, पूर्व आणि ईशान्य भारतात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.

Weather Forecast Tomorrow: देशभरात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभाग (IMD) ने उद्याचा म्हणजेच 13 ऑगस्टचा अंदाज जाहीर केला आहे. IMD नुसार, पुढील 7 दिवसांत राजस्थान, उत्तर प्रदेश, पूर्व आणि ईशान्य भारतात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. केरळ, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक आणि रायलसीमा येथे पुढील ५ दिवसांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हे देखील वाचा: Delhi Rain: पावसाच्या पाण्यामुळे तयार झालेल्या डबक्यात बूडून 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, दिल्लीतील रोहिणी भागातील घटना

जाणून घ्या, देशातील उद्याचे हवामान

हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटनेही १३ ऑगस्टचा अंदाज जाहीर केला आहे. स्कायमेटच्या मते, पुढील 24 तासांत उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, झारखंड, ईशान्य भारत, केरळ, तामिळनाडू, रायलसीमा आणि दक्षिण कर्नाटकचा अंतर्गत भाग काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. याशिवाय पूर्व राजस्थानमध्ये काही ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश, विदर्भ, दक्षिण कर्नाटक, गोवा, किनारी कर्नाटक, कोकण महाराष्ट्र, पूर्व गुजरात, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. लडाख, राजस्थानचा पश्चिम भाग, सौराष्ट्र आणि कच्छ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण तेलंगणा, उत्तर अंतर्गत कर्नाटकात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.