Weather Forecast Tomorrow: उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि पूर्व भारतातही मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या, 16 ऑगस्ट रोजीचा हवामान अंदाज

IMD नुसार, 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट दरम्यान, केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय पुढील पाच दिवसांत पश्चिम हिमालयीन प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि पूर्व भारतातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Weather Forecast Tomorrow: भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील तीन दिवस देशाच्या दक्षिणेकडील भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. IMD नुसार, 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट दरम्यान, केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय पुढील पाच दिवसांत पश्चिम हिमालयीन प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि पूर्व भारतातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसांत हरियाणा, राजस्थान आणि ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीस मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, गुजरात, मध्य महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि दिल्लीत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये 19 ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस पडू शकतो. हे देखील वाचा: Pune Weather Forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज

देशात कसे असेल उद्याचे हवामान? जाणून घ्या 

दिल्लीत पुढील दोन दिवस पावसाचा 'यलो अलर्ट' हवामान खात्याने जारी केला आहे. शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

चक्रीवादळाचा परिणाम पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये दिसून येईल. त्यामुळे दोन्ही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारनंतर राजस्थानच्या पूर्व भागात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.