Delhi IAS Coaching Center Tragedy: दिल्लीमध्ये अभ्यासिकेत घुसलं पाणी; 3 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? जाणून घ्या

राव कोचिंग सेंटर दुर्घटनेबद्दल बोलताना दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी म्हणाल्या की, अग्निशमन सेवा आणि एनडीआरएफ घटनास्थळी तैनात आहेत. दिल्लीचे महापौर आणि स्थानिक आमदारही घटनास्थळी आहेत. मी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Delhi IAS Coaching Center Tragedy (PC - X/@autopsy_surgeon)

Delhi IAS Coaching Center Tragedy: राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जुने राजेंद्रनगर (Old Rajinder Nagar) येथील राव आयएएस कोचिंग सेंटर (Rau's IAS Study Circle) च्या तळघरात (Basement) पाणी साचले. पाण्याने भरलेल्या तळघरात बुडून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. राव कोचिंग सेंटर दुर्घटनेबद्दल बोलताना दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी म्हणाल्या की, अग्निशमन सेवा आणि एनडीआरएफ घटनास्थळी तैनात आहेत. दिल्लीचे महापौर आणि स्थानिक आमदारही घटनास्थळी आहेत. मी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या अपघाताला जो कोणी जबाबदार असेल त्याला सोडले जाणार नाही.

कोचिंगच्या तळघरात पाणी कसं भरलं?

कोचिंग सेंटरमध्ये इतके पाणी कसे भरले? की त्यामुळे विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, तळघरात बांधलेल्या लायब्ररीत सुमारे 30-35 विद्यार्थी उपस्थित होते. सायंकाळी 7 वाजता वाचनालय बंद झाल्यानंतर बाहेर पडताच समोरून अतिशय दाबाने पाणी येत होते. आम्ही लायब्ररी रिकामी केली तोपर्यंत ती गुडघाभर पाण्यात होती. (हेही वाचा - Delhi Rain: दिल्लीत पुढीत दोन ते तीन तासांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज)

प्रवाह इतका जोरात होता की आम्हाला पायऱ्या चढता येत नव्हत्या. 2-3 मिनिटांत संपूर्ण तळघर 10-12 फूट पाण्याने भरले. तिथून बाहेर पडण्यासाठी दोर टाकण्यात आले, पण पाणी इतके घाण होते की काहीच दिसत नव्हते. तेथून एक- एक करून मुलांना बाहेर काढले जात होते. माझ्या मागे आणखी दोन मुली आल्या. ज्या बाहेर येऊ शकल्या नाहीत. (हेही वाचा - (हेही वाचा- मुंबईसह कोकण -पश्चिम महाराष्ट्राला हाय अलर्ट; पुण्यात अतिवृष्टीचा इशारा)

पहा व्हिडिओ - 

सायंकाळी 7 वाजता हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याआधीही इथे पाणी साचले होते, आठवडाभरापूर्वी ते पाण्याने भरले होते. त्यामुळे आम्हाला वरच्या बाजूलाच थांबवण्यात आले. मागच्या वेळी जेव्हा आम्ही क्लासला आलो होतो तेव्हा सकाळी दहाच्या सुमारास आम्हाला तळघरात जाण्याची परवानगी नव्हती, अनेक विद्यार्थ्यांच्या गाड्या तरंगत होत्या. दिल्लीच्या महापौर शैली ओबेरॉय यांनी या अपघाताबाबत बोलताना सांगितले की, नाला किंवा गटार फुटल्यामुळे तळघरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. एमसीडी अधिकाऱ्याची चूक निदर्शनास आल्यास कठोर कारवाई केली जाईल.