Uttar Pradesh: मुरादाबाद येथे कोरोना लस घेतल्यानंतर वॉर्ड बॉयचा दुसऱ्याचं दिवशी मृत्यू? नेमक काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

त्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. महिपाल सिंह असं या वॉर्ड बॉयचं नाव आहे.

Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

Uttar Pradesh: मुरादाबादमध्ये कोरोना लस (Corona Vaccine) घेतल्यानंतर जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या एका 45 वर्षीय वॉर्डबॉयचा (Ward Boy) दुसऱ्याचं दिवशी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र, हृदयविकाराचा झटक्यामुळे वॉर्ड बॉयचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितलं आहे. कोरोना लस घेतल्यानंतर मुरादाबाद जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या वार्ड बॉयची प्रकृती अधिकचं बिघडली. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. महिपाल सिंह असं या वॉर्ड बॉयचं नाव आहे. 16 जानेवारी रोजी महिपाल यांना कोरोनाची लस देण्यात आली होती. त्यानंतर रविवारी सायंकाळी त्यांची प्रकृती खालावली.

महिपाल यांची प्रकृती जास्तचं बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रविवारी जिल्हा रुग्णालयाच्या सीएमओने आज तकला प्रतिक्रिया देताना सांगितले की, महिपाल यांच्यावर कोरोना लसीचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यांच्या मृत्यूच्या कारणाचा तपास करण्यात येत आहे. महिपालला यापूर्वी कोरोनाची लागण झाली नव्हती, असं रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. (वाचा - Covishield सह अजून 4 कोरोना विषाणू लसींवर काम करत आहे सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया; जाणून घ्या सविस्तर)

महिपाल यांचा मुलगा विशाल यांनी सांगितले की, 16 जानेवारी रोजी त्यांच्या वडिलांनी त्याला जिल्हा रूग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले होते. कारण, त्यांना कोरोना लस देण्यात येणार होती.16 जानेवारीला लसीकरणानंतर तो वडिलांना घरी घेऊन आला. मात्र, घरी आल्यानंतर त्यांनी श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागला. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह होती. त्यांना न्यूमोनिया झाला होता. रुग्णालयातून आल्यानंतर त्याचा त्रास आणखी वाढला होता.

मुरादाबादचे मुख्य वैद्यकीय अधिकारी एमसी गर्ग यांनी सांगितले की, महिपाल यांच्या मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टमनंतरचं कळू शकेल. दरम्यान, आज मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी महिपाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सांगितले आहे. रुग्णालय या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif