West Bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये आज 35 जागांसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू; भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी बजावला मतदानाचा हक्क

यावेळी ते म्हणाले की, यापूर्वी मी इतक्या शांततेने कधीच मतदान केले नव्हते. मी सर्व सुरक्षा दलांचे अभिनंदन करतो.

Actor and BJP leader Mithun Chakraborty (PC - ANI)

West Bengal Assembly Election 2021: पश्चिम बंगालमध्ये आज विधानसभा निवडणूकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. बंगालमधील आठव्या आणि अंतिम टप्प्यातील 35 जागांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. येथे 84 लाखाहून अधिक मतदार 283 हून अधिक उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. सकाळी सात वाजता मतदान सुरू झाले असून संध्याकाळी सहा पर्यंत मतदार सुरू राहणार आहे. मतदानासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूर्वीच्या टप्प्यात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः चौथ्या टप्प्यातील मतदानात, ज्यात कूचबिहारमध्येप पाच जणांचा मृत्यू झाला होता, तेथे सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. (वाचा - Kesar Singh Gangwar Dies: भाजप आमदार केसर सिंह गंगवार यांचे कोरोनामुळे निधन)

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अभिनेता आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी उत्तर कोलकाता येथे मतदान केले. यावेळी ते म्हणाले की, यापूर्वी मी इतक्या शांततेने कधीच मतदान केले नव्हते. मी सर्व सुरक्षा दलांचे अभिनंदन करतो.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आज बंगालमधील निवडणुकांचा शेवटचा टप्पा आहे, कोरोना प्रोटोकॉलचे पालन करून मतदान करा आणि लोकशाहीचा हा महापर्व बळकट करा.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif