Kolkata Rape-Murder Case: निदर्शनादरम्यान RG Kar Medical College मध्ये हिंसाचार; जमावाकडून रुग्णालयाची तोडफोड
गेल्या आठवड्यात महिला डॉक्टरचा मृतदेह सापडलेल्या वैद्यकीय सुविधेच्या काही भागाची त्यांनी तोडफोड केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 40 लोकांचा एक गट, कथितपणे हॉस्पिटलच्या आवारात घुसला. त्यांनी मालमत्तेची तोडफोड केली आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली.
Kolkata Rape-Murder Case: पश्चिम बंगालच्या राजधानीतील आरजी कार मेडिकल कॉलेज (RG Kar Medical College) मध्ये ड्युटीवर असलेल्या डॉक्टरवर झालेल्या बलात्कार (Rape) आणि हत्येच्या (Murder) निषेधार्थ बुधवारी मध्यरात्री पश्चिम बंगालमधील हजारो महिला रस्त्यावर उतरल्या. दरम्यान, घटनास्थळी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांवर बाहेरून आलेल्या जमावाने हल्ला केला. तसेच डॉक्टरांना मारहाणही केली. याशिवाय रुग्णालय परिसरातील वाहनांची मोडतोड करत पोस्टर्स फाडले. जमावाने रुग्णालय मालमत्तेची तोडफोड केल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली.
दरम्यान, कोलकाता पोलिस आयुक्त विनीत गोयल यांनी याप्रकरणी गुरुवारी प्रसारमाध्यमांवर टीका केली. चुकीच्या आणि दुर्भावनापूर्ण मीडिया मोहिमेमुळे हा प्रकार घडल्याचा आरोप गोयल यांनी केला आहे. येथे जे घडले ते चुकीच्या, दुर्भावनापूर्ण मीडिया मोहिमेमुळे झाले. कोलकाता पोलिसांनी काय केले नाही? कोलकाता पोलिसांनी या प्रकरणात सर्व काही केले. आम्ही कुटुंबाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु अफवा पसरवल्या जात आहेत. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. माध्यमांच्या दुर्भावनापूर्ण मोहिमेमुळे जनतेचा कोलकाता पोलिसांवरील विश्वास उडाला आहे, असं गोयल यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा -Rape & Murder of Doctor at Kolkata Hospital: कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य होईपर्यंत BMC MARD कडूनही 13 ऑगस्ट पासून Non-Emergency Medical Services बंद ठेवण्याचा निर्णय)
गोयल यांनी पुढे बोलताना सांगितलं की, आम्ही कधीच म्हटले नाही की फक्त एकच आरोपी आहे. आम्ही म्हटले आहे की आम्ही वैज्ञानिक पुराव्याची वाट पाहत आहोत, आणि त्यासाठी वेळ लागतो. फक्त अफवांवर आधारित, मी तरुण पीजी विद्यार्थ्याला अटक करू शकत नाह. हे माझ्या विवेकाच्या विरुद्ध आहे. मीडियाचा खूप दबाव आहे, आता सीबीआयचा तपास सुरू आहे. (Kolkata Doctor-Rape Murder Case: कोलकाता प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, देशभरात निदर्शने)
आरजी कार मेडिकल कॉलेजची जमावाकडून तोडफोड -
रुग्णालयातील डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या विरोधात महिलांनी मध्यरात्री केलेल्या निदर्शनेनंतर काही वेळातच सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या आवारात अज्ञात जमावाने प्रवेश केला. गेल्या आठवड्यात महिला डॉक्टरचा मृतदेह सापडलेल्या वैद्यकीय सुविधेच्या काही भागाची त्यांनी तोडफोड केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 40 लोकांचा एक गट, कथितपणे हॉस्पिटलच्या आवारात घुसला. त्यांनी मालमत्तेची तोडफोड केली आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. (हेही वाचा, Kolkata Rape Case: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात रुग्णालयाच्या प्राचार्यांचा राजीनामा)
पहा व्हिडिओ -
हिंसाचारात पोलिस कर्मचारी जखमी -
या हिंसाचारात काही पोलीस अधिकारी जखमी झाले. तसेच घटनास्थळी पोलीस वाहन आणि काही दुचाकींचेही नुकसान झाले. कोलकाता पोलिसांनी रुग्णालयाबाहेर पुरेसे कर्मचारी तैनात केले असून परिस्थिती हाताळण्याच्या सूचना दिल्या आहेत.