Kumbh Mela 2021: हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्यातील दुसऱ्या शाही स्नानादरम्यान भाविकाकडून कोरोना नियमांचे उल्लंघन; पहा तुडूंब गर्दीचे फोटोज
त्यानुसार, सकाळी सात वाजेपर्यंत भाविकांना हरकी पैडीवर स्नान करता येणार आहे.
Kumbh Mela 2021: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज हरिद्वारमधील कुंभात दुसरे शाही स्नान पार पडत आहे. पोलिस प्रशासनाने आखाड्यांसाठी आपली तयारी पूर्ण केली आहे. पण शाही स्नान करण्यापूर्वी हरिद्वार मध्ये Har Ki Pauri येथे भाविकांनी तुडूंब गर्दी केली. सामान्य लोक शाही स्नानाच्या अगोदर गंगेमध्ये स्नान करण्यासाठी आले. यावेळी भाविकांनी कोविड नियमांचा फज्जा पाडला.
कुंभमेळ्याचे आयजी संजय गुंजयान यांनी सांगितलं की, आम्ही कोविड नियमांचे अनुसरण करण्यासाठी सतत लोकांना आग्रह करत आहोत. परंतु, प्रचंड गर्दीमुळे हे व्यावहारिक अशक्य आहे. प्रचंड गर्दी पाहता घाटावर सोशल डिस्टन्सिंग सारख्या नियमांचे पालन करणे अशक्य आहे. जर आपण हे करण्याचा प्रयत्न केला, तर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवू शकते. (वाचा - COVID-19 Vaccination in India: भारताने लसीकरणात गाठला 10 कोटींचा टप्पा; ठरला सर्वात वेगवान देश)
संजय गुंजयान यांनी पुढे बोलताना सांगितलं की, सकाळी 7 वाजेपर्यंत घाटावर सर्वसामान्यांना स्नान करण्यास परवानगी दिली जाईल. त्यानंतर ही जागा आखाड्यांसाठी राखीव असेल. आम्ही परिस्थिती पहात आहोत. सोमवती अमावस्येच्या शाही स्नानासाठी कुंभमेळा पोलिसांनी भाविकांच्या सोयीसाठी हरकी पैड़ी वर स्नान करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार, सकाळी सात वाजेपर्यंत भाविकांना हरकी पैडीवर स्नान करता येणार आहे. यानंतर, सामान्य भाविकांना हरकी पैडी परिसरास प्रवेश करता येणार नाही. त्यानंतर हा परिसर आखाड्यांच्या संतांच्या स्नानासाठी आरक्षित असेल.