Video: रुग्णालयात दाखल रुग्णाची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या, छत्तीसगडच्या रायपूरमधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रुग्णालयातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव राम विस्वालचे असून त्यांचे वय 60 वर्ष होते. ते ओडिशातील बारगढ जिल्ह्यातील बारपाली गावातील छिंदाईकेलाचे रहिवासी होते.
Video: छत्तीसगडमधील रायपूर येथील रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रुग्णालयातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव राम विस्वालचे असून त्यांचे वय 60 वर्ष होते. ते ओडिशातील बारगढ जिल्ह्यातील बारपाली गावातील छिंदाईकेलाचे रहिवासी होते. रुग्ण मानसिक आजारी असल्याचीही माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीला मायग्रेनचा त्रास होता. 22 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेथे रुग्णावर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. मात्र रुग्णाने जाऊन खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. हे देखील वाचा: International Dog Day निमित्त आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी पाळीव श्वानासोबत करा 'या' खास अॅक्टिवीटी
पाहा पोस्ट:
रुग्णालयाच्या खिडकीतून रुग्णाची आत्महत्या सर्वजण खाली आले असता मयत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते व त्याच्या डोक्याला गंभीर जखमा होत्या. या घटनेची माहिती तेलीबांध पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. रुग्णाने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी कुटुंबीयांचे जबाबही नोंदवले जाणार आहेत.