IPL Auction 2025 Live

Uttarakhand Cloudburst: टिहरीच्या केदारनाथ आणि घणसाळीत ढगफुटी, अनेक यात्रेकरू अडकले, मोठ्या नुकसानाची भीती

मुसळधार पावसात डोंगरातून ढग फुटण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. केदारनाथमध्ये पुन्हा एकदा निसर्गाचा कहर पाहायला मिळत आहे. बुधवारी रात्री उशिरा केदारनाथ परिसरात ढग फुटल्याची माहिती मिळाली आहे. केदारनाथमध्ये ढगफुटीनंतर प्रचंड विध्वंस होण्याची शक्यता आहे. ढगफुटीनंतर मंदाकिनी नदीची पाणीपातळी धोकादायक बनली आहे.

Uttarakhand Cloudburst

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे कहर सुरूच आहे. मुसळधार पावसात डोंगरातून ढग फुटण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. केदारनाथमध्ये पुन्हा एकदा निसर्गाचा कहर पाहायला मिळत आहे. बुधवारी रात्री उशिरा केदारनाथ परिसरात ढग फुटल्याची माहिती मिळाली आहे. केदारनाथमध्ये ढगफुटीनंतर प्रचंड विध्वंस होण्याची शक्यता आहे. ढगफुटीनंतर मंदाकिनी नदीची पाणीपातळी धोकादायक बनली आहे. गौरीकुंडात गोंधळाचे वातावरण आहे. ढगफुटीचे वृत्त मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनासह सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. केदारनाथ धाममध्ये सुमारे 200 यात्रेकरू अडकल्याची शक्यता आहे. टिहरी जिल्ह्यातील घणसालीच्या जखन्यालीजवळील नौतर गडेरे येथे ढग फुटल्याचे वृत्त आहे. या घटनेत किती नुकसान झाले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. नौताद गडेरेजवळील एक हॉटेल वाहून गेल्यानंतर तीन जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावकरी बेपत्ता लोकांच्या शोधात व्यस्त आहेत. याशिवाय अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. हे देखील वाचा: LPG Price Hike: व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 8.50 रुपयांनी वाढ, घरगुती मात्र स्थिर; घ्या जाणून

केदारनाथमध्ये ढगफुटी 

Breaking🚨: Cloudburst on the Kedarnath trekking route leaves 150 to 200 pilgrims stranded.

Sudden rise in water levels in the #Sonprayag River; #Mandakini River now flowing above the danger mark🚨#Uttrakhand #Kedarnath #delhirain#flood #GOLD #Olympics pic.twitter.com/40pTooVhJc

— pradhyumn sharma (@pradhyu78651514) July 31, 2024

केदारनाथमधील धोकादायक दृश्य मुसळधार

Cloudburst on the Kedarnath trekking route leaves 150 to 200 pilgrims stranded. A 30-meter stretch of the path has been damaged.

Sudden rise in water levels in the Sonprayag River; Mandakini River now flowing above the danger mark.#BreakingNews #Kedarnath #CloudBurstpic.twitter.com/tJCRWuXXoL

— Kumaon Jagran (@KumaonJagran) July 31, 2024

पावसामुळे हरिद्वार जलमय 

हरिद्वारमध्ये बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले होते. शहरातील अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेले असून, कानखल पोलिस ठाण्यातही पावसाचे पाणी शिरले. तीन तासांच्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह इतका वाढला की, कोरड्या, कोरड्या नदीत डाक कानवड्यांचा एक ट्रकही वाहून गेला.