Uttar Pradesh Shocking: भावाच्या डोक्यात घातला सिलिंडर, पुतण्यालाही केले ठार; उत्तर प्रदेशच्या 19 वर्षीय तरूणाचे धक्कादायक कृत्य

ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हरदोईमध्ये (Hardoi) शुक्रवारी (6 ऑगस्ट) पहाटे घडली आहे.

Image used for representational purpose

पैशांच्या वादातून एका 19 वर्षीय तरुणाने आपल्या मोठ्या भावासह पुतण्याचीही हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हरदोईमध्ये (Hardoi) शुक्रवारी (6 ऑगस्ट) पहाटे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नोकरीच्या शोधात आपल्या भावाकडे राहायला आला होता. मात्र, पैशांवरून त्यांच्यात वाद झाला. याच वादातून आरोपीने त्याचा मोठा भाऊ आणि पुतण्याच्या डोक्यात घरगुती गॅस सिलिंडर घालून त्यांची हत्या केली. या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच या गुन्ह्यात वापरलेले गॅस सिलिंडर जप्त केले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अवदेश (वय, 30) आणि आशु (वय, 14) असे मृतांची नावे आहेत. हे दोघेही कोतवाली शहरात एका सायकलच्या दुकानात कामाला होते. त्यानंतर अनमोलही नोकरीच्या शोधात त्यांच्याकडे राहायला आला होता. दरम्यान, शुक्रवारी अवदेश आणि अनमोल यांच्यात पैशांमुळे वाद झाला. याचा रागातून अनमोलने त्याच रात्री अवदेश झोपेत असताना त्यांच्या डोक्यात गॅस सिलिंडर घातला. त्यावेळी आशुने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनमोलने आशुलाही जबर मारहाण केली. ज्यामुळे त्याचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे देखील वाचा- Surat: नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून बायकोने केले तरुणीचे मुंडन

याप्रकरणी पोलिसांनी अनमोल यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे, डॉक्टर अनमोलची मानसिक आजारासंबंधितची तपासणी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.