Uttar Pradesh: शाळेत शिक्षक पाहत होता अश्लील व्हिडीओ, विद्यार्थ्याने पकडताच केली बेदम मारहाण

याचा राग आल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.

Photo Credit- X

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या एका मुलाला शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याने शिक्षकाला मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहताना पाहिल्याचा (UP Teacher Watches Porn )आरोप आहे. त्यामुळे शिक्षक संतापले आणि त्यांनी मुलाला बेदम मारहाण(Student Trashed) केली. याबाबत मुलाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात (Teacher Arrested) घेऊन चौकशी सुरू केली आहे.

हे प्रकरण झाशी जिल्ह्यातील पूंछ पोलीस स्टेशन हद्दीतील डिव्हाईन लाइट पब्लिक स्कूलमध्ये घडले आहे. विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले की, त्यांचा मुलगा शाळेत गेला होता. शाळेतील शिक्षक कुलदीप यादव वर्गात आपल्या मोबाईलवर एक अश्लील व्हिडीओ पाहत होते, ते पाहून मुले वर्गात आपापसात बोलू लागली आणि हसायला लागली. (Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी 75 दहशतवाद्यांचा खात्मा; अतिरेकी मृतांच्या यादीत बारामुल्ला भाग अग्रस्थानी)

याचा राग आल्याने शिक्षक कुलदीप यादव यांनी मुलाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. केस पकडून विद्यार्थ्याचे डोके भिंतीवर आदळले आणि अपशब्द वापरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मारहाणीमुळे विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली आहे. विद्यार्थ्याने घरी येऊन घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली, त्यानंतर मुलाचे वडील त्याला घेऊन पोलीस ठाण्यात गेले. (Toxic Gas Leak In Chemical Plant At Gujarat: गुजरातमधील भरूचमध्ये केमिकल प्लांटमध्ये विषारी वायूची गळती; 4 कामगारांचा मृत्यू)

मारहाणीमुळे विद्यार्थ्यी जखमी

विद्यार्थ्याच्या वडिलांनी तक्रारीत सांगितले की, त्यांच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. आरोपी शिक्षक कुलदीप यादवने तिचे केस पकडून भिंतीवर आपटले त्यामुळे त्याच्या कानाला दुखापत झाली. तसेच लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आरोपी शिक्षकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे.