Uttar Pradesh Accident Video: रस्ता ओलांडताना ट्रकने तरुणाला चिरडले, अति धुक्यांमुळे अपघात; उन्नाव येथील घटना

या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

accident By Fog

Uttar Pradesh Accident Video: उत्तर प्रदेशात अति धुक्यामुळे ट्रकच्या धडकेत  एका तरुणाने जीव गमावला आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही दुर्घटना उन्नाव येथे घडली. ट्रक पेट्रोल पंपच्या बाहेर येताच रस्ता ओलांडणाऱ्याला तरुणाला धडकली आणि त्याच ट्रकने पीडिताला चिरडले. यात तो गंभीर जखमी झाला. हा अपघात अतिधुक्यांमुळे झाल्याची माहिती समोर येत आहे. सोहरामाळ पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद घेतली आहे.  (हेही वाचा- देवीकोट चौकात भरधाव कारचे नियत्रंण सुटल्याने रस्ता ओलांडणाऱ्या दोघांना धडक,)

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे एक अपघात झाला. या अपघातात युवक रस्ता ओलांडताना ट्रकने धडक दिली. या धडकेत तरुणाला ट्रकने चिरडून टाकले. तरुण या अपघातात गंभीर जखमी झाला. शमीम खान असे मृत तरुणाचे नावआ हे. तो आशा खेडा येथील रहिवासी आहे. ही घटना सोहरामाळ पोलिस स्टेशन हद्दीतील आशा खेडा पेट्रोल पंपावर घडली. पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. शमीम मित्रासोबत रस्ता ओलांडत होता. त्यावेळी एक ट्रक पेट्रोल पंपावरून येत होते परंतु रस्ता ओलांडत असलेला तरण ट्रक चालकाला अति धुक्यांमुळे दिसला नाही.

गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांची कारवाई सुरु आहे. या थरकाप उडवाणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.