Uttar Pradesh Accident: पिकअप आणि डंपरच्या धडकेत भीषण अपघात, चार जणांचा दुर्दैवी मृत्यू, उत्तर प्रदेशातील घटना

उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील ओराई पोलिस स्टेशन हद्दीत ट्रकने पिकअपला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

up Accident

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील ओराई पोलिस स्टेशन हद्दीत ट्रकने पिकअपला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन महिलांसह चार जण ठार झाले आणि जवळपास 10 प्रवासी जखमी झाले आहे अशी माहिती पोलिसांना दिली आहे. झाशी कानपूर नॅशनल हायवे 27 वर बुंदेलखंड ओव्हर ब्रिजवर ही घटना घडली. जिल्ह्यातील मोहना गावातील 30 लोक रविवारी सकाळी ओरछा आणि दतिया येथे पिकनिकसाठी गेले होते. रविवारी रात्री परतत होते त्यावेळी अपघात झाला. (हेही वाचा- शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला, भाजी विक्रीसाठी जाताना माळशेज घाटात अपघात)

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास पिकअप कैथरी टोल प्लाझाजवळ येताच मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने वाहनाला धडक दिली.  झाशी कानपूर येथील नॅशनल हायवे २७ वर अपघात झाला. ही टक्कर इतकी जोरदार होती की पिकअप महामार्गाच्या कडेला उलटली, ज्यामुळे दोन महिला - एक अल्पवयीन मुलगी आणि एक लहान मूल जागीच मरण पावले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतला. पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

रुग्णावाहिकेच्या मदतीने सर्व जखमी प्रवाशांना ओराई येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. या अपघातानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अधिकारी घटनास्थळी पोहचून योग्य ती कारवाई सुरु केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement