Ahmednagar kalyan Accident: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला, भाजी विक्रीसाठी जाताना माळशेज घाटात अपघात, आठ जणांचा मृत्यू
अहमदनगर जिल्ह्यातून कल्याण महामार्गावर माळशेज घाटाजवळ भीषण अपघात झाला आहे. दुर्दैवाने अपघातात एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला.
Ahmednagar kalyan Accident: अहमदनगर जिल्ह्यातून कल्याण महामार्गावर माळशेज घाटाजवळ भीषण अपघात झाला आहे. दुर्दैवाने अपघातात एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला. ओतूरवरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकपने रिक्षा आणि ट्रकला जोरदार धडक दिली. या घटनेची सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेली आहेत. भाजीपाला घेऊन ओतूरहून कल्याण शहरात पीकअप जात होता. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात शेतकरी कुटुंबातील आठ सदस्य जागीच ठार झाले. (हेही वाचा- संगमनेरमध्ये भीषण अपघात, टेम्पो कारवर कोसळल्याने चार प्रवाशांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, डिंगोरे- पिंपळगाव जोग गावच्या सीमेवर नगर कल्याण हायवे रोडजवळ असणाऱ्या पेट्रोलपंपा समोर ही घटना घडली. कल्याण दिशेने ओतूरकडे येणारी रिक्षा आणि पिकअप यांच्यात भीषण अपघात झाला. रिक्षा ओतूरच्या दिशने जात होती तेव्हा पिकअपने रिक्षाला धडक मारली. या धडकेत रिक्षा चालक आणि दोन प्रवाशी यांचा मृत्यू झाला. ही धडक एवढी भीषण होती की, पिकअपमधील चालक आणि कॅबिनमध्ये बसलेली त्याची पत्नी, मुलगा मुलली आणि एक हमाल यांचा जागीच मृत्यू झाला.
गणेश मस्करे वय.30 वर्ष (चालक मयत), कोमल मस्करे वय.25 वर्ष (चालकाची पत्नी), हर्षद मस्करे वय.4 वर्ष (चालकाचा मुलगा), काव्या मास्करे वय .6 वर्ष (चालकाची मुलगी) सर्व रा. मड.तालुका जुन्नर जिल्हा पुणे, अमोल मुकुंदा ठोखे यांचा मृत्यू झाला. इतर मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून त्यांचा शोध सुरु आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 18, 2023 10:08 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

