UP Crime: संतापजनक! थकीत असलेली 800 रु. मजूरी मागितली म्हणून तरुणाला घरात कोंडून मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद (Watch Video)

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मेरठमध्ये गुंडांराजने परिसीमा गाठली आहे. एका मजुराने थकीत असलेली त्याचे 800 रुपये मागिल्याप्रकरणी तरूणाच्या टोळक्याने त्याला बेदम मारहाण केली. गुंडांनी तरुणाला रस्त्यावरून उचलून नेत घरात कोंडून मारहाण केली.

UP Crime: संतापजनक! थकीत असलेली 800 रु. मजूरी मागितली म्हणून तरुणाला घरात कोंडून मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद (Watch Video)
Photo credit - twitter

UP Crime : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील मेरठमध्ये गुंडांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं दिसत आहे. कारण एका मजुराने (Labour) 800 रुपयांच्या थकबाकीची मागणी केली असता त्याला जोरदार मारहाण (Beat) करण्यात आली आहे. गुंडांनी तरुणाला रस्त्यावरून उचलून घरात कोंडले आणि मारहाण केली. मारहाण केल्यानंतर गुंडांनी त्या तरुणाला पुन्हा रस्त्यावर फेकले. तरूणाला उचलून नेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मेरठच्या लिसाडी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. (हेही वाचा :Uttar Pradesh Crime: खर्चासाठी पैसे देण्यास नकार दिला, मुलाने वडिलांच्या हत्येची सुपारी दिली; उत्तर प्रदेशमधील घटना )

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 08, 2024 06:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).