UP Shocker: क्रिकेट सट्टेबाजीत लाखो रुपये गमावल्याने सरकारी शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या; बुकीने पैशांसाठी दबाव टाकल्याचा भावाचा आरोप (Watch)

पोलिसांनी आत्महत्या केलेल्या शिक्षकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी सांगितले की, याबाबत पुढील तपास आणि कारवाई सुरु आहे.

Suicide | (Photo Credits: unsplash.com)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) ललितपूरमध्ये क्रिकेट सट्टेबाजीत (Cricket Betting) पैसे गमावल्यानंतर एका सरकारी शाळेतील शिक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेट सट्टेबाजीत शिक्षकाने लाखो रुपये हरल्यानंतर, पैसे जमा करण्यासाठी बुकीकडून दबाव आणला जात होता. या त्रासाला कंटाळून शिक्षकाने स्वतःचे जीवन संपवले.

या घटनेनंतर शिक्षकाच्या भावाने बुकीवर गंभीर आरोप करत, आपल्या भावावर पैशासाठी दबाव आणल्याचे सांगितले. सट्टेबाजांकडून पैशांसाठी निर्माण होत असलेला दबाव सहन न झाल्याने त्याच्या भावाने आत्महत्या केल्याचे त्याने सांगितले.

चंद्रशेखर असे या शिक्षकाचे नाव असून तो जालौनच्या पिंडारी गावचा रहिवासी होता. देशात सट्टेबाजीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो आणि सट्टेबाज खेळात पैसे गमावणाऱ्या लोकांवर दबाव निर्माण करतात. त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी शिवीगाळ आणि मारहाणही केली जाते. मृत शिक्षकाच्या भावाने सांगितले की, त्याच्या भावाला सट्टेबाजीचे व्यसन होते. गेली 2-3 वर्षांपासून तो सट्टेबाजी करत होता. तो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि इतर स्पर्धांमध्ये क्रिकेट खेळांवर सट्टा लावत असे.

भावाने पुढे माहिती दिली की, चंद्रशेखरने बेटिंगमध्ये रक्कम गमावल्यानंतर आपण 16 लाख रुपयांची रक्कम सेटल केली. त्याआधी बुकी त्याच्यावर पैसे देण्यासाठी दबाव आणत होता. भावाने पुढे सांगितले की, ही पूर्ण रक्कम सेटल झाल्यानंतर चंद्रशेखरने सट्टेबाजी सोडण्याचे आश्वासन दिले होते. बुकीने गेममध्ये गमावलेल्या रकमेवर व्याजही आकारले आणि व्याजासह रक्कमही घेतल्याचे त्याच्या भावाने सांगितले. (हेही वाचा: Rape Case: व्यक्तीचा 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पोलिसांची अटक टाळण्यासाठी 400 किमी पायी चालत पोहोचला आपल्या गावी, जाणून घ्या सविस्तर)

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आत्महत्या केलेल्या शिक्षकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी सांगितले की, याबाबत पुढील तपास आणि कारवाई सुरु आहे.