Uttar Pradesh Crime News: अयोध्यात साधूची गळा दाबून हत्या, दोघांना अटक, परिसरात एकच खळबळ

हनुमानगढ मंदिर परिसरातील नागा साधू यांची हत्या करण्यात आली आहे.

Crime (PC- File Image)

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील अयोध्या येथून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हनुमानगढ मंदिर परिसरातील नागा साधू यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून साधूच्या दोन शिष्यांना अटक करण्यात आले आहे. पोलिस या घटनेअंतर्गत चौकशी करत आहे. राम सहारे दास असं मृत साधूचे नाव होते. ते ४० वर्षाचे असल्याची माहिती मिळाली. बुधवारी ही घटना घडली.

पोलिसांच्या चौकशी दरम्यान साधूच्या गळावर निशान दिसल्याने त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली असं स्पष्ट झाले आहे. अंंकित दास आणि ऋषभ शुक्ला असे आरोपींचे नाव आहे. हनुमान गढ मंदिराचे पुजारी राम चरण दास यांनी सांगितले की, हत्या करून आरोपी घटनास्थळावरून खोली बंद करून फरार झाले. घटनेची माहिती सकाळी ६ वाजता पोलिसांना मिळाली. राम चरण यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, साधूंच्या खोलीचा दरवाजा बराच वेळ बंद असल्यामुळे त्यांनी दरवाजा वाजवण्यास सुरुवात केली, परंतु खोलीतून कोणीही प्रतिसाद देत नसल्यामुळे खोलीचा दरवाजा खोलून आत गेले. खोलीत राम सहारे दास बेशुध्द अवस्थेत खाली पडले होते. जवळ गेल्यावर त्यांना ते मृत अवस्थेत दिसले.

पोलीसांना या घटनेची माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी या घटनेअंतर्गत दोघांना अटक केली आहे. दोघेही  आरोपी साधूचे शिष्य होते अशी माहिती मिळाली. पोलिस या घटनेअंतर्गत आणखी तपास करत आहे. साधू उत्तर प्रदेशात गेले ३० वर्षापासून स्थायिक होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.