Uttar Pradesh Shocker News: आधी पत्नीचा अपघातात मृत्यू, नंतर दीड तासानंतर नवऱ्यालाही गाडीने चिरडले; उत्तर प्रदेशातील वेदनादायक घटना
दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.
Uttar Pradesh Shocker News: उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे एकाच कुटूंबातील एकाच दिवशी दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. महिलेचा मृत्यू आधी झाला तर त्याचवेळी महिलेच्याा मृत्यूनंतर अवघ्या दीड तासातंच तिच्या पतीचाही दुसऱ्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यू नंतर गावात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी देण्यास आले होते. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले.
महमूदपूर माफी गावातील रहिवासी विमला देवी आपल्या मुलासह बाईक वरुन घरी जात असताना लाडूपूरा गावाजवळ मागून दुसऱ्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात विमला गंभीर जखमी झाल्या त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात होती.
विमला यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या पतीला देण्यात आली. इतर कुटुंबातील सदस्यांना देखील त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. घरातून दुसऱ्या मुलासह श्यामलाल रुग्णालयासाठी निघाले. रुग्णालयाच्या समोरून रस्ता ओलाडंताना एका अज्ञात व्यक्तीने दुचाकीवर येऊन धडक दिली. याच धडकेत ते भरपुर गंभीर झाले.या अपघातात श्मामलाल यांचा वेदनादायक मृत्यू झाला. मात्र, धडक दिल्यानंतर वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
लोकांनी फरार चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो फरार झाला. या घटनेची माहिती पोलिसांत देण्यात आली आहे. पोलिस या घटनेअंतर्गत फरार व्यक्तीच्या शोधात आहे. कुटुंबातिल एकाच घरातील दोघांचा मृत्यू झाल्याने घराच्यांना खुप मोठा धक्का बसला आहे. गावाकऱ्यांनी खुप मोठा हंबरडा फोडला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्दात गुन्हा नोंदवला आहे.