UP Gangrape: उत्तर प्रदेशात अधिकाऱ्याच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांकडून FIR नोंदवण्यास टाळाटाळ

एका अधिकाऱ्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Representative Image

UP Gangrape: देशात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे, दरम्यान उत्तर प्रदेशातील एका अधिकाऱ्यावर दुखाचे डोंगर कोसळले आहे. राज्यातील लखनऊ येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. एका अधिकाऱ्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी पाच दिवसांपर्यंत या प्रकरणाचा एफाआयआर नोंदवलाच नाही. या घटनेनंतर शहर हादरलं आहे. पीडित तरुणी शहारतील एका मोठ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तीन आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. (हेही वाचा- गोरखपूर मध्ये छठपूजा करून परतणार्‍या दहावी मधील मुलीवर सामुहिक बलात्कार

सुत्रांच्या माहितीनुसार, ही घटना ५ डिसेंबर रोजी घडली. तीन तरुणांनी गोमतीगर येथील अधिकाऱ्याच्या मुलीला आमिष दाखवून स्टेशनजवळ एका ठिकाणी नेलं. घटनास्थळी कोणीच नव्हते. आरोपींनी पीडितेवर अत्याचाक केले. एका मागून एकाने पीडितेवर अमाणुषपणे बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आरोपी फरार झाले. पीडितेने या घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. कुटुंबियांनी पोलिसांना या घटने माहिती दिली. परंतु पोलिसांनी या घटनेचा एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ केला. त्यानंतर पाच दिवसांनी वरिष्ठांनी या घटनेंची गांभीर्याता लक्षात घेऊन एफआयआर नोंदवला.

तीन आरोपींपैकी एक खासगी रुग्णवाहिका चालक आहे. दोन आरोपींनी मेडिकल कॉलेजजवळ चहाची टपरी लावली. सत्यम. शोएब आणि अस्लम अशी आरोपींची नावे आहेत. बलात्कारादरम्यान पीडितेचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला आहे. आरोपींवर कडक कारवाई करा अशी मागणी पीडितेच्या कुटुंबियाकडून करण्यात आली आहे.