Uttar Pradesh Shocker: मेरठमध्ये नवऱ्याने स्वतःवर गोळी झाडली नंतर पत्नीने देखील विष प्राशन केले

त्यानंतर पत्नीने देखील विष घेतल्याची माहिती मिळाली आहे. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Suicide Representational Image (Photo Credits: ANI)

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील मेरठ मध्ये एका व्यक्तीने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्या नंतर त्याच्या पत्नीने विष प्राशन केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीसांना या घटनेची माहिती देण्यात आली. तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शनिवारी विपीन कुमारने आत्महत्या केली आणि तीच्या पत्नीने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपीन कुमार आणि त्याचा धाटका भावामध्ये जमिनीच्या वादावरून हे कृत्य केले आहे. विपीन कुमारचा लहान भाऊ अरविंद त्याला संपुर्ण जमीन हवी होती त्यामुळे दोघांमध्ये काही दिवासापासून भांडण चालूच होते. या वादाला त्याचे वडिलांनी देखील लहान भावाला सर्पोट दिला त्यामुळे रागाच्या भरात आत्महत्या केल्याची माहिती स्थानिकांनी दिली.  विपीन कुमारला मुलबाळ नव्हते.

घटनेनंतर अरविंद आणि वडिल फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीसांना घटनास्थळावरून पिस्तून सापडली नाही. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहे. लवकरच आरोपी ताब्यात असेल अशी माहिती पोलीसांनी वृत्तांना दिली आहे.

 



संबंधित बातम्या