UP Shocker: सायकल चालवणाऱ्या मुलीचा तरूणाने दुपड्डा खेचला, ती खाली पडली अन् पुढे जे घडले ते अनपेक्षित (Watch Video)
एका तरुणाने तीच्या स्कार्फ हिसकावला, तीचा तोल गेला ती थेट सायकल वरून खाली रस्त्यावर पडली.
UP Shocker: एका शाळकरी मुलीचा शाळेतून घरी जातना मोठी आघात झाला. एका तरुणाने तीच्या स्कार्फ हिसकावला, तीचा तोल गेला ती थेट सायकल (Cycle) वरून खाली रस्त्यावर पडली. मागून बाईक आल्याने तीला जोरात धडक लागली. या घटनेत तिचा मृत्यू झाला. वृत्तानुसार शाळेच्या वेळेनंतर ही नेहमी प्रमाणे सुटली, सायकल वरून घरी जात असताना तीच्या सोबत ही घटना घडली. ही घटना सर्व सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर येथील ही घटना आहे.
ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका शाळकरी मुलीचा घरी जात असताना तरुणाने छळ केल्यानंतर तिचा भीषण अपघात झाला. 17 वर्षीय तरुणी सायकलवरून जात असताना दोन जणांनी तिचा दुपट्टा ओढला. त्यानंतर ती सायकलवरून पडली आणि भरधाव बाईकवरून आलेल्या दुसर्या एका व्यक्तीने धडक दिली, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलीला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, असे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, त्यात असे म्हटले आहे की, ही मुलगी दुपारी साडेतीनच्या सुमारास घरी परतत असताना तिघांनी तिचा छळ केला. एफआयआरमध्ये मुलीच्या वडिलांनी सांगितले की, शाहनवाज आणि अरबाज या दोन पुरुषांनी त्यांच्या मुलीचा छळ करण्याचा प्रयत्न केला आणि तिचा दुपट्टा ओढला. जेव्हा ती खाली पडली तेव्हा फैजल नावाच्या दुसऱ्या एका व्यक्तीने तिच्या दुचाकीसह तिच्यावर धाव घेतली.
पीडित कुटुंबाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत नाव असलेल्या आरोपींना अटक करण्यात आली आहे."