Uttar Pradesh Shocker: लग्नाच्या तिसर्याच दिवशी तरुणाची आत्महत्या, उत्तरप्रदेशातील घटना
मंगळवारी एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील उन्नावमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मंगळवारी एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तीन दिवसांपूर्वीत त्याचे लग्न झाल्याची माहिती मिळाली आहे. तरुणाने गावाबाहेरील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आत्महत्याची माहिती मिळताच, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह पोस्टमार्टसाठी पाठवण्यात आला आहे. तरुणाचा पत्नीला या घटनेमुळे धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबियांनी दिलेल्या माहितीत तरुणाची मानसिक आजाराने त्रस्त होता. याच कारणाने त्याने आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली आहे. दीपू गौतम असं मृताचे नाव आहे. पोलिस चौकशीत दीपूच्या कुटुंबियांना सांगितले की, 22 ऑक्टोबर रोजी बलवंत खेडा गावात राहणाऱ्या तरुणीशी लग्न झाले. लग्नानंतर त्यांनी तीन दिवसांनी 25 ऑक्टोबर रोजी त्याने आत्महत्या केली. कुटुंबियांनी सांगितल्या प्रमाणे, दीपूचे वैवाहिक आयुष्य आनंदी होते.
या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. दीपूच्या कुटुंबियांनी कोणतीही तक्रार दिलेली नाही. पोलिसांच्या चौकशीत त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे त्यांनी सांगितले. मृतदेह पोस्टमार्टसाठी पाठवण्यात आला आहे. या संदर्भात पोलिस पुढील चौकशी करत आहे. दीपू हा चार भांवडापैकी सर्वात लहान होता.