Delhi Crime: अज्ञातांनी घरासमोर केला गोळीबार, सुदैवाने कोणतीही दुखापत नाही, भयावह घटनेचा Video आला समोर

दिल्लीतील यमुना विहार येथे गुरुवारी रात्री दोन अज्ञात तरुणांनी एका घराबाहेर गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

delhi Crime PC ANi

Delhi Crime: दिल्लीतील यमुना विहार येथे गुरुवारी रात्री दोन अज्ञात तरुणांनी एका घराबाहेर गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेची एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. दिल्लीतील ईशान्य भागात असलेलं यमुना विहार येथील C- 10 / 132 बाहेर रात्री 11.18 वाजता ही घटना घडली आहे. मात्र, या घटनेत सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही अशी माहीती पोलिसांनी दिली. (हेही वाचा- प्रेमसंबंधावरून पत्नीचा गळा चिरला, मुंडके हातात घेऊन परिसरात फिरला)

मिळालेल्या माहितीनुसार, घराबाहेर स्कूटीवरून आलेल्या दोन मुलांनी गोळीबार केला. अनेक वेळा फायरिंग केल्याचे दिसत आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. गोळीबारच्या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी घटनास्थळावरून गोळ्या जप्त केल्या आहे. गोळीबार करत असताना मागून एकाने हा व्हिडिओ कॅमेरात कैद केला.

या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. दोन अज्ञांता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात सगळीकडे घबराटी वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस या प्रकरणात पुढील तपास करत आहे. मिळालेल्या फुटेजच्या आधारे पोलिस हल्लेखोरांचा तपास घेत आहे. गोळीबार का केला याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. मागिल वर्षात देखील तीन अज्ञात हल्लेखोरांने गोळीबार केल्याचे समोर आले आहे.त्यात घटनेत एक जण गंभीर जखमी झाला होता.