Sikkim Accident: अनियंत्रित टॅंकरची तीन वाहानांना धडक, अपघतात 3 ठार, 20 लोक जखमी

अनियंत्रित दुधाच्या टॅंकरने पार्क केलेल्या तीन गाड्यांना धडक दिली आहे.

Sikkim Accident PC Twitter

Sikkim Accident: सिक्कीमच्या राणीपूल येथे एका जत्रेच्या मैदानाजवळ दुर्घटना घडली आहे. अनियंत्रित दुधाच्या टॅंकरने पार्क केलेल्या तीन गाड्यांना धडक दिली आहे. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे आणि 20 लोक जखमी झाले. ही घटना शनिवारी  (१० फेब्रुवारी) घडली. ही घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेत अपघातात अडकलेल्या आणि जखमी लोकांना बाहेर काढले. सोशल मीजियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ( हेही वाचा- कारची अवजड वाहनाला धडक,समृध्दी महामार्गावर तिघांचा मृत्यू,)

मिळालेल्या माहितीनुसार, राणीपूल येथे जत्रेच्या मैदानाजवळ अनियत्रिंत टॅंकरची धडक तीन गाड्याना लागल्याने अपघात झाला. अपघतात २० लोक गंभीर जखमी झाले आणि तीन लोकांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ सेंट्रल रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात मृतांची संख्या वाढू शकते अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

घटनास्थळी अपघातानंतर बराच वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. दुधाच्या टँकरवर सिक्कीम मिल्क युनियनचे लेबल होते.अपघातात मृत झालेल्याची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. या अपघातात तीन ते चार गाड्यांचे संपुर्ण नुकसान झाले आहे. पोलिस अपघाताची चौकशी - तपासणी करत आहे.

 

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif