Bihar Accident: बिहारमध्ये अनियंत्रित स्कॉर्पिओ कार झाडाला आढळली, अपघातात तिघांचा मृत्यू

बिहारमधील नवादा जिल्ह्यातील राजौली पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी पहाटे एक अनियंत्रित स्कॉर्पिओ कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली.

Accident (PC - File Photo)

Bihar Accident:  बिहारमधील नवादा जिल्ह्यातील राजौली पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी पहाटे एक अनियंत्रित स्कॉर्पिओ कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. या अपघातात दुर्दैवाने तीन मित्रांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहे. नवादा येथील सिरडाळा- राजौली मार्गावरील धरमपूर वळणावर ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. कारमधून पाच जण मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टी साजरी करून घरी जात होते दरम्यान हीदुर्घटना घडली. (हेही वाचा- शालेय सहलीच्या बसला भीषण अपघात; शिक्षकाचा मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी काही मित्र रात्री उशिरा राजौली येथे गेले होते, दरम्यान त्याचा अपघात झाला. सर्वजण स्कार्पिओमध्ये वाढदिवसाच्या पार्टीवरून परतत होते. दरम्यान, धरमपूर वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळले. राजौली पोलिस ठाण्याचे अधिकारी पवन कुमार यांनी सांगितले की, या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले

विकेव कुमार (26), रोशन कुमार (27) खानवान गाव आणि चंदन कुमार (27) अशी या अपघातात मृत झालेल्या तरुणांची नावे आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवले आहे. या प्रकरमी पोलिस अधिक तपास करत आहे.