Delhi Accident: अनियंत्रित कार घुसली दुकानात, अनेक जण जखमी; पहा भीषण अपघाताचा व्हिडिओ

दिल्लीच्या राजपूर रोडवर भीषण अपघात झाला आहे. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Delhi Accident: अनियंत्रित कार घुसली दुकानात, अनेक जण जखमी; पहा भीषण अपघाताचा व्हिडिओ
delhi Accident Video PC TWITTER

Delhi Accident: दिल्लीच्या राजपूर रोडवर भीषण अपघात झाला आहे. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. कार भरधाव वेगात असते आणि थेट एका दुकानावर आदळते. कारच्या धडकेत दुकानात असलेले काही लोक दूर फेकले गेले आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघातामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. (हेही वाचा- सांगलीत भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, 4 मजुरांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजच्या व्हिडिओत दिसल्याप्रमाणे हा अपघात ३१ मार्च रोजी घडला आहे. दिल्लीच्या राजपूर रोडवरील सिव्हिल लाइन्सवरील फतेह कचोरी दुकानात भीषण अपघात झाला आहे. दुकानात ग्राहक कचोरी घेण्यासाठी आले होते त्यावेळी एक कार अनियंत्रित होऊन थेट दुकानात घुसली आहे. दुकानात उभे असलेले लोकांना कारने उडवले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमरात कैद झाली आहे.  अपघातानंतर लोक गंभीर जखमी झाले आहे.

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, अनियंत्रित कार थेट दुकानाला धडकली. या भीषण अपघातात कचोरीचे दुकान संपुर्ण उध्द्वस्त झाले आहे. अनेक जण गंभीर जखमी झाले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघातात कारचे समोरील भागाचे चेंदामेंदा झाला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 02, 2024 11:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).