जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा
मात्र, अशा परिस्थितीतदेखील पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाई केल्या जात आहेत. जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील मनगोरी परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. मनगोरी परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आहे. त्यामुळे सध्या या परिसरात भारतीय जवानांकडून शोधमोहीम सुरू आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. मात्र, अशा परिस्थितीतदेखील पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाई केल्या जात आहेत. जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील मनगोरी परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. मनगोरी परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आहे. त्यामुळे सध्या या परिसरात भारतीय जवानांकडून शोधमोहीम सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये कुलगाममध्ये चकमक सुरू झाली. या परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर भारतीय जवानांकडून संबंधित परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान या चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. (हेही वाचा - Air India चे बुकिंग 30 एप्रिलपर्यंत बंद तर Vistara चे बुकिंग 15 एप्रिलपासून होणार सुरु)
पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. या चकमकीत दहशतवाद्यांकडून सुरुवातीला गोळीबार करण्यात आला. त्यामुळे या गोळीबाराला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. यापूर्वी अनेकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये सुंदरबन परिसरात शुक्रवारी सीमारेषेचं उल्लंघन करण्यात आलं होतं. तसेच गोळीबारही करण्यात आला होता. या हल्ल्याला भारतीय जवानांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं होतं.