Medical Students Die in Road Accident: कोईम्बतूरजवळ महाराष्ट्रातील दोन वैद्यकीय विद्यार्थ्यांचा रस्ता अपघातात मृत्यू
जय शितल मुंडे (20) आणि ऋषिकेश रामेश्वर गुट्टे (21) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही मूळचे महाराष्ट्रातील आहेत.
Medical Students Die in Road Accident: कोईम्बतूर (Coimbatore) मधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोईम्बतूर-पोल्लाची मेन रोडवरील अरसमपालयम पिरिवूजवळ गुरुवारी संध्याकाळी दुचाकी एका मिनीट्रकला धडकल्याने दोन वैद्यकीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. जय शितल मुंडे (20) आणि ऋषिकेश रामेश्वर गुट्टे (21) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही मूळचे महाराष्ट्रातील आहेत.
ते कोंडमपट्टी येथील महाराजांच्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये वैद्यकीय शाखेचे द्वितीय वर्षाचे विद्यार्थी होते. किनाथुकडावू येथील लक्ष्मी नगर येथे हे दोघे भाड्याच्या घरात राहत होते. (हेही वाचा -Mumbai Accident: दोन वाहनांची भीषण धडक, एका चालकाचा मृत्यू, जोगेश्वरी येथील घटना)
पोलिसांनी सांगितले की, हे दोन्ही विद्यार्थी गुरुवारी संध्याकाळी मोटारसायकलवरून चहाच्या दुकानात गेले होते. ते आपल्या घरी परतत असताना हा अपघात झाला. त्यांच्या दुचाकीने मिनीट्रकच्या मागून धडक दिली. दोघेही रस्त्यावर पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. (हेही वाचा - Jammu Kashmir Accident: जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, कार दरीत कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू)
दरम्यान, शवविच्छेदनानंतर शुक्रवारी दुपारी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. किनाथुकडावू पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणातील मिनीट्रकचा शोध घेण्यासाठी ते परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करत आहेत.