Kishtwar Encounter: किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद, 2 जण जखमी

तर आणखी दोन जण जखमी झाले. गुप्तचर माहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांना संयुक्त कारवाई केली तेव्हा ही चकमक झाली.

Photo Credit- X

Kishtwar Encounter: जम्मू - काश्मीर येथील किश्तवाड जिल्ह्यातील छत्रू भागात शुक्रवारी दहशतवाददी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दोन भारतीय जवान शहीद झाले. तर आणखी दोन जण जखमी झाले. गुप्तचर माहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांना संयुक्त कारवाई केली तेव्हा ही चकमक झाली. माहिती मिळताच चकमक सुरु झाली. त्यानंतर सुरक्षा दलांना परिसरात शोध मोहिम सुरु केली. (हेही वाचा- जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय यंत्रणा अ‍ॅक्शन मोडमध्ये; अमित शाह यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक)

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी जम्मू काश्मीरच्या छत्रू भागातील नैदघम भागात लपले होते. तेवढ्यात दहशतवादींनी गोळीबार सुरु केला. या गोळीबारच्या घटनेत चार भारतीय सैनिक गंभीर झाले. त्यापैकी दोघांना तेथे वीरमरण आले. भारतीय लष्कराच्या व्हाईट नाइट कॉर्प्सने या दु;खद घटनेची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (X) वर शेअर केली. "व्हाईट नाइट कॉर्प्स आणि सर्व श्रेणी शहीदांच्या सर्वोच्च बलिदानाला सलाम करतात आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती आमची तीव्र संवेदना व्यक्त करतात," असं पोस्टमध्ये म्हटले आहे. पोस्टसोबत शहीद जवानांचे फोटोही शेअर केले आहेत.

शहीद जवानांना श्रद्धांजली

किश्तवाड येथे काल दुपारी चकमक सुरु झाली. दोन्ही बाजूने गोळीबार सुरु झाला होता. गोळीबारमध्ये अनेक जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आधी जम्मू - काश्मीरमध्ये कठुआ जिल्ह्यातील खंडारा भागात सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. भारतीय लष्कराच्या रायझिंग स्टार कॉर्प्सने हे ऑपरेशन केले.